राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या रविवारी चंद्रपूर येथे बैठकीचे आयोजन!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व तालुकाध्यक्ष/शहर/विधानसभा अध्यक्ष तसेच पक्षाचे सर्व विभागांचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नेते यांची बैठक चंद्रपूर येथे उद्या दि.२६/०९/२०२१ ला दु १२.३० वा.विश्रामगृह चंद्रपूर इथे आयोजित करण्यात आली आहे. बैठक खालील महत्वपूर्ण विषयांवर आयोजित करण्यात आली आहे.*
*१) पुढील महिन्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ obc नेते व अन्न,नागरी पुरवठा मंत्री मा.ना.श्री.छगन भुजबळ साहेब यांचा तसेच जिल्ह्याचे संपर्क मंत्री मा.ना.श्री.प्राजक्त तनपुरे यांचा होणाऱ्या दौऱ्याबाबत माहिती देणे व नियोजन करणे.*
*२) चंद्रपूर जिल्ह्यासाठी माजी खासदार श्री.सुबोध मोहिते यांची प्रभारी म्हणून नियुक्ती नुकतीच झालेली आहे,आणि ते पुढील महिन्यात तालुकानिहाय दौरा करणार आहेत,या दौऱ्यात ते बूथ निहाय पक्ष बांधणी,पक्षाच्या सर्व संघटना व सेलच्या तालुक्या तालुक्यात नियुक्त्या झालेल्या आहेत की नाही,या सर्व बाबी तपासणार आहेत,त्या सर्व बाबींवर माहिती व चर्चा करणार आहेत.*
*३)जिल्ह्यात येत्या काही दिवसांमध्ये नगर पंचायत,न.पलिका/पं समिती,/जि.प./पं.स.या निवडणुका होवू घातल्या आहेत,या निवडणुका बाबत सुद्धा चर्चा या बैठकीत होणार आहे. कृपया आपण या बैठकीस आमंत्रित आहात,आपण न चुकता वेळेवर या बैठकीस हजर राहावे ही विनंती.*
*आपला विनीत*
*राजेंद्र वैद्य*