जंगलात सरपण गोळा करायला गेलेल्यांवर वनरक्षकाने केली बेदम मारहाण! एकाचा मृत्यू!





जंगलात सरपण गोळा करायला गेलेल्यांवर वनरक्षकाने केली बेदम मारहाण! एकाचा मृत्यू!




न्याय न मिळाल्यास बिएसपी कडून आंदोलनाचा ईशारा!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-
चंद्रपूर, वन विभागातर्फे येणाऱ्या जुनोना जंगलपरीसरात सरपण व बांबु तोडण्यासाठी गेलेल्या लोकांना जबर मारहाण केली. त्यात सुरेंद्र देवाडकर वय 45वर्षे याला जबर मारहाण करण्यात आल्याने त्याचा आज दुपारी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. सविस्तर माहितीनुसार असे कि, आम्रपाली चौक बाबुपेठ येथील हातावर आणून पानावर खाणारे घटी कुटुंब
आपली मोल मजूरी करण्यासाठी व काही
व्यवसाय करण्यासाठी उदिवसापुर्वी जुनोना जंगलात सरपण व बांबु तोडण्याकरीता सुरेंद्र देवाडकर, विलास मुठ्ठावार, अनिता मुठ्ठावार, किशोर ठाकूर व इतर काहीजण गेले होते. तेव्हा कर्तव्यावर असलेले वनरक्षक बालाजी राठोड व त्यांचे सहकारी हे बांबु व सरपण गोळा करीत असलेल्या ठिकाणी जाऊन, हे जंगल तुम्हच्या बापाची आहे का ! तुम्ही सरपण व बांबु कसे तोडत आहात तुम्ही कोणाला विचारले असे धमकावीत त्यांना बेदम मारहाण केली. त्या वनरक्षकाच्या तावडीतून कसेबसे आपले जिव वाचवत गाव गाठले. मात्र वनाधिकाऱ्यांनी या झालेल्या घटनेची कुठेही वाचता करू नका अन्यथा वनविभागाच्या कायद्यानुसार तुम्हच्यावर कार्यवाही करू अशी तंबी दिल्याने ते निरपराध चुप राहीले. मात्र आम्रपाली चौकातील सुरेंद्र देवाडकर यांचा जबर मारहाणीमुळे आज दुपारी त्याचा मृत्यु झाल्याचा आरोप देवाडकर कुटुंबीयांनी केला आहे.
या झालेल्या घटनेची सकोल चौकशी करावी, निरपराध लोकांना बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी तुरंत दोषींवर कारवाई करावी. अन्यथा बिएसपी तर्फे
आमरण उपोषणास बसले असे बिएसपी नेते तथा नगरसेवक अणिल रामटेके यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
याआटोप घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वनरक्षक बालाजी राठोड हे परार झाल्याची माहिती आहे. परार झाल्याची माहिती मिळताच पोलिस त्यांच्या मागावर आहेत.