नगराध्यक्ष- अहेतेशाम अली यांचा हस्ते आनंद निकेतन कॉलेज येथे ई-कचरा संकलन केंद्र चे उदघाटन

नगराध्यक्ष- अहेतेशाम अली यांचा हस्ते आनंद निकेतन कॉलेज येथे ई-कचरा संकलन केंद्र चे उदघाटन

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
आजचा परिस्थितीत आधुनिक उपकरण वापरने ही लोकांचे स्टेटस बनले आहे अशा परिस्थितीत आपल्या घरी,परिसरात खराब असलेले इलेक्ट्रॉनिक उपकरनांची संख्या दिवसेंन दिवस वाढत आहे.या उपकरांना योग्य प्रकारे डिस्पोज नाही केले तर पर्यावरनच नाही तर मनुष्य जीवनाच्या आरोग्यावर सुधा वाईट परिणाम होते..त्यासाठी ई-कचरा एकत्रित करने अतिशय गरजेचे आहे.याचिच दखल घेत आनंदनिकेतन महाविद्यालय यांचा पर्यावरण आरोग्य व सुरक्षा समिति,नगर परिषद आणि सुरिटेक प्रा.लि.बुतिबोरी यांचा संयुक्ताने ई-कचरा केंद्र चे उदघाटन आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिनाचे औचित्य साधून वरोरा शहराचे नगराध्यक्ष- श्री.अहेतेशाम अली यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपप्राचार्य राधा सवाने यांनी आपल्या घरी जमा होणारा ई-कचरा याचे व्यवस्थापन कसे करायचे यावर मार्गदर्शन करून या समस्या चे समाधान या केंद्रावर होणारे अशी माहिती दिली.या प्रसंगी प्राचार्य श्री.मूणाल काले,श्री.प्रशांत वाघ,डॉ.संयोगिता वर्मा,प्रा.मनोहर चौधरी तथा आयोजन समिति चे सदय्य,महाविद्यालय येथील शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते..!