राज्य सरकारने दक्षता बाळगण्याची गरज - जयदीप कवाडे

राज्य सरकारने दक्षता बाळगण्याची गरज - जयदीप कवाडे

दिनचर्या न्युज :-
मुंबई / नागपूर
केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून देशात इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे प्रचंड महागाई सामना देशाच्या जनतेला सोसावा लागत आहे. एव्हढेच काय तर प्रचंड वाढलेली बेरोजगारी व केंद्राचे शेतकरी विरोधी धोरणामुळे गरीब, शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठिण झाले आहे. अशातच त्रिपुरातील घटनेचे पडसाद आज महाराष्ट्रात दंगली घडवून पाहायला मिळत आहे. अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागात धार्मिक तेढ निर्माण करून देषाच्या सोहार्दतेला सुरूंग लावण्याचा कुटील डाव केंद्रातील मोदी सरकार करीत असल्याचा घणाघात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, देशात दंगली पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असल्याचा आरोपीही जयदीप कवाडे यांनी केला. आज अमरावतीत काही लोकांनी बंद पुकारा होता त्यामुळे सकाळपासून पोलिस फिल्डवर तैनात होते. मात्र, दंगलच घडवून हिंसाचारचे लोन पसरविण्याचा प्रयत्न दगडफेक कारणाऱ्यानी केला. यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सोसावे लागले. अश्या घटना पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने दक्षता बाळगण्याची गरज असल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले.