बोरगाव कवडशी येथील नामदेव मांडवकर यांच्यावर जंगली डुक्करने हमला करून केलेली जखमी





बोरगाव कवडशी येथील नामदेव मांडवकर यांच्यावर जंगली डुक्करने हमला करून केलेली जखमी

शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

दिनचर्या न्युज
वरोरा:-
वरोरा वन परिक्षेत्रातील बोरगाव कवडशी येतील शेतकरी नामदेवराव मांडवकर वय 75 वर्ष हे आपल्या शेतात शेतीतील काम करण्याकरिता गेले असता. जंगली डुकराने त्याच्यावर अचानक हल्ला करुन त्यांना जखमी केले. प्रथम उपचार वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयात करून त्यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी तातडीने जखमीला आर्थिक भरपाई देण्यात यावी, शेतातील मालाचे झालेले नुसकान ,  वन्य  प्राण्यांचा बंदोबस्त करावा तसेच  जंगली डुकरा पासून होणाऱ्या नुसकान भरपाई चे शेतकऱ्या  मोबदला देण्यात यावा. अशी मागणी आता गावातील नागरिक करीत आहेत.
 वारंवार होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या   हल्ल्यापासून नागरिक त्रस्त झाले असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.