राँष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष मा.ना.श्री.जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, बेबीताई उईके, यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात चावडी बैठक!
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष मा.ना.श्री.जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून गावच्या चावडीवर/शहरातील मुख्य चौकात चावडी कार्यकर्ता बैठकांचे आयोजन करून,या बैठकांमध्ये त्या त्या गावातील/वार्ड मधील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याच्या दृष्टीने पक्षाच्या त्या गावातील/वॉर्डातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यायचा आहे.याच अनुषंगाने जिल्ह्यात एकंदरीत तिच्या जवळपास चावळी बैठकीचे आयोजन केले आहे.
भिवापुर वॉर्ड ,माता नगर, लालपेठ येथे माननीय नगरसेविका सौ. मंगलाताई आखरे यांच्या वार्डातील मूलभूत समस्या संदर्भात नागरिकांच्या समस्या महाकाली वार्डातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. वार्डातील मूलभूत समस्या ही
जमिनीच्या पट्ट्याची असून, 70 टक्के घरे हे नजूल च्या जागेवर असून, त्यांना स्थायी स्वरूपाचे पट्टे मिळण्यात यावे, नजूलच्या जागेवर बांधलेल्या घरांना मनपाकडून टॅक्स पावती देण्यात यावी अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी नगर विकास मंत्रालया आपण याबाबत पाठपुरावा लवकरच करू अशी ग्वाही दिली.
तसेचवार्डात होत असलेल्या अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम संथ गतीने चालू आहेत. ते लवकरात लवकर करून नागरिकांना पाणी मिळण्यात यावे यासाठीही चर्चा झाली.बैठकीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, घरकुल,रेशन दुकानातून कमी धान्य मिळणे, महाकाली वार्डातील अनेक घरांना स्वच्छालय असल्याची बाबा समोर आली, ज्या संदर्भात आपल्या विचार मांडला,नाली व रस्त्यांच्या समस्या अश्या विविध प्रश्नांवर नागरिकांनी आपापल्या तक्रारी मांडल्या.
यावेळी राष्ट्वादी कांगेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैध ,महिला राँका जिल्हाध्यक्ष बेबिताई ऊईके,नगरसेविका मंगलाताई आखरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर कातकर,राँका जिल्हधायक्ष बाराबलुतेदार दिनेश एकवनकर, माजी नगर सेवक राजेंद आखरे, विधानसभा निवडणूक प्रचारचक सुरज चौव्हान,नंदु मेश्राम,
चिमुरकर,कमलेश ठाकरे,नामा तुराणकर,दामु निखारे, वार्डातील महिला व पुरुष यांची उपस्थिती होती.