चं. म. ओ. वि. केंद्रात काम करणाऱ्या कर्मचारी / कामगारांना रिजेक्ट गेट द्वारे प्रवेश व व्यायाम शाळा साहित्य देण्यात यांवे - पंकज ढेंगळे




चं. म. ओ. वि. केंद्रात काम करणाऱ्या कर्मचारी / कामगारांना रिजेक्ट गेट द्वारे प्रवेश व व्यायाम शाळा साहित्य देण्यात यांवे - पंकज ढेंगळे

मा. ना. श्री. प्राजक्त तनपुरे साहेब उर्जा राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर

दिनचर्या न्यूज :-
, चंद्रपूर:-
चं. म. औ. वि. केंद्र प्रकल्पात कर्मचारी व कामगारांना जाण्याकरीता मेजर गेट सि. ई. ऑफीस जवळ, २ गेट व रिजेक्ट गेट अशी एकूण ४ गेट आहे. परंतु यापैकी रिजेक्ट गेट हा कर्मचाऱ्यांच्या प्रवेशाकरी मागील ३-४ हा बोल ना वर्षापासून बंद करण्यात आला आहे.
प्रकल्पात काम करणारे अनेक कर्मचारी कामगार हे नागपूर रोड, पडोली लगतच्या भागात राहतात यांना ये-जा करणेकरीता हा गेट जवळ पडतो. सदर गेट प्रवेशाकरीता बंद केल्याने कर्मचारी व कामगार यांना जवळपास दररोज ५ किलोमीटर जासत फिरून येणे जोण करावे लागत आहे. त्यामुळे पेट्रोलचा अधिक आर्थिक भार सहन करावा लागत आहे. जंगली प्राण्यांची सुध्दा भिती असुन पूर्वीप्रमाणेच रिजेक्ट गेट हा कर्मचारी/कामगारांना यांना प्रकल्पात ये-जा करण्याकरीता सुरू केल्यास कामगारांना वेळ व पैसा दोघांची बचत होईल. म्हणून कृपया रिजेक्ट गेट सुरू करणेकरीता संबंधित जणांना निर्देश दयावे. तसेच
चं. म. औ. वि. केंद्रात व्यायाम शाळा साहित्याची साधने दुरुस्ती करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंचायत समिती सदस्य पंकजभाऊ ढेंगळे यांनी मा. ना. श्री. प्राजक्त तनपुरे साहेब उर्जा राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य त्यांच्याकडे जॉन कल्याणच्या दृष्टिकोनातून मागणी केली आहे.
चं. म. औ. वि. केंद्र येथील सुमारे ८ ते १० वर्ष असलेली उजनगर व्यामशाळा जेव्हापासून तयार झाली तेव्हापासून त्यांच्यावर काही दुरुस्ती झाली नाही, तसेच व्यायाम शाळेचे साहित्य साधने नुतनीकरण झालेली नाही. वसाहत येथील नागरीकांना त्या साधनापासून व्यायाम करण्यापासून त्रास होत आहे. त्याची दुरुस्ती करण्यात यावी.
जेणेकरून नागरीकांचे आरोग्य चांगले रहावे. याकरीता त्वरीत व्यायाम साहित्य साधनाची दुरुस्ती करण्यात यावी. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, नितीन भटारकर, अमोल ठाकरे, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.