पारडी ठवरे येथे नवीन विज्ञान प्रयोगशाळा वर्गखोली बांधकाम, जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते भुमीपुजन





पारडी ठवरे येथे नवीन विज्ञान प्रयोगशाळा वर्गखोली बांधकाम,
जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते भुमीपुजन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
नागभीड तालुक्यातील पारडी- मिंडाळा- बाळापुर क्षेत्रातील पारडी ठवरे येथील उच्च प्राथमिक जि.प.शाळेतील नवीन विज्ञान प्रयोगशाळा वर्गखोली बांधकामाचे भुमीपुजन या क्षेत्राचे जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पं.स.सदस्य संतोष रडके यांची विशेष उपस्थिती होती. दोन वर्षाआधी येथे संपन्न झालेल्या बीटस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी या विज्ञान वर्गखोलीबाबत दिलेल्या शब्दाची वचनपुर्तता होत असल्याबद्दल संजय गजपुरे यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.
               पारडी ठवरे येथे आतापर्यंत आरोग्य उपकेंद्राची दुरुस्ती व नुतनीकरण , खनिज निधीतून शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीडी वर्क व राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याचे सौंदर्यीकरण , समाजकल्याण निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसराचे सौंदर्यीकरण , जिल्हा निधीतून सिमेंट रस्ता व नाली बांधकाम ,ओपन जिम साहित्य , यांसह इतर कामांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी संजय गजपुरे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे.
                    यासोबतच जि.प.शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी जि.प.च्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून उपक्रमशील शाळा म्हणून एक लक्ष व पाच हजार रुपयांच्या विशेष निधी ची तरतुद संजय गजपुरे यांनी करून दिली होती. यातून शालेय व्यवस्थापन समिती मार्फत संगणक तथा विविध शालेय उपक्रम व वाचनालयाला लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यात आली आहे.  शैक्षणिक व वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून शाळेसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देणारे उपक्रमशील व विकासाभिमुख जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचे विशेष आभार या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष गोपाल मस्के यांनी मानले.  
                       या भुमीपुजन प्रसंगी पं.स.सदस्य व तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रडके , पारडी ठवरे चे सरपंच दिलीप दोनाडे ,  उपसरपंच नंदुभाऊ खोब्रागडे , ग्रामसचिव रतीराम चौधरी , ग्रा.पं.सदस्य नितेश शेन्डे, अमोल सारये, सौ.दर्शनाताई गजभिये, सौ.अनिताताई ठवरे, सौ.सुनिताताई ठवरे, सौ.सुरेखाताई गजभे, सौ.गिता रडके , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  गोपाल मस्के  , मुख्याध्यापक मालचंद खंडाळे सर , सुनिल हटवार सर, गौतम राऊत सर, धनराज पडोळे सर, दयाराम रामटेके सर, सुबोध हजारे सर , अशोक शेंडे सर तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक हरीदास ब्राह्मणकर ,देवीदास बागडे,स्वप्नील ठवरे,अंकित खांडपुरे,गजानन भोयर उपस्थित होते.

दिनचर्या न्युज