रेती व्यवसायातून गलेलठ्ठ संपत्ती,मुख्यमंत्री फडणवीसांची सदिच्छा भेट! पहा राजकीय समीकरण !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील रेती व्यवसायाचे अग्रगणनी नाव असलेले मधु मेश्राम यांनी 28 सप्टेंबरला मुल येथील माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या वाड्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत सदिच्छा भेट घडवून आणली. या भेटी मागचे राजकीय समीकरण हे आता जनतेसमोर येत आहे.
जिल्ह्यात वाळू तस्करीचे 'रॉकेट' चालवणारे 'मधु' यांनी यापूर्वी काँग्रेसकडून जुनूना- चिचपल्ली क्षेत्रातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी असलेल्या मधूने अचानक फडणवीस वाड्यावर मुख्यमंत्र्याची भेट शोभाताईंनी घडवून आणली. रेतीच्या व्यवसायातून गल्लेलट संपत्ती जमवून रस्त्यावर असलेल्या छोट्यास्या
गावात अनेक गाड्यांचा मालक, मुख्य रस्त्याला लागूनच प्रोजेक्ट तयार असलेल्या मधुला मात्र सत्तेत असलेल्या राजकीय प्रवाहात जाण्याची चर्चा गाव खेड्यात होत आहे. ही राजकीय भेट, की काय? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र यामुळे गावातील सक्रिय भाजप कार्यकर्त्यात नाराजी असून, 40 ते 50 वर्षापासून भाजप पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असल्याची बाप समोर येत असून या नव्या भेटीमुळे अनेकाच्या भुवया उंचावल्या आहे.जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असल्याची चर्चाही होत आहे.
चंद्रपूर -गडचिरोली जिल्ह्यात रेती तस्करीचे मोठे 'रॉकेट' सक्रिय असून याबाबत मोठ्या तक्रारी आल्या असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपुरात दौऱ्यावर आले असता पत्रकारांना दिली होती. तस्करीत मोठ्या राजकीय लोकांचे वरदस्त असल्याचे ते बोलले होते. त्यांनी ब्रह्मपुरी या एकट्या तालुक्यातून वाळू तस्करीच्या सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले होते. राजकीय आशीर्वादानेच ही वाळू तस्करी सुरू आहे.
अशातच मधुची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होणे! म्हणजे रेती तस्करीला पाठबळ देणे होय काय? असा प्रश्न आता नागरिकात होत आहे.
या फोटोतून स्पष्ट दिसून येत आहे की, पुढील राजकीय रणनीती ही काकूच्या बंगल्यावरून राजकीय पक्षाच्या अध्यक्षा पर्यंत वलय असल्याचे बोलले जाते.
मधुचे जिल्हा व पोलीस प्रशासनासोबत चांगले वरदस्त असून. त्यांच्या हुकमी एकया शिवाय कुठल्याही वाळू तस्कराचे वाहन पुढे सरकत नाही. आता तर चक्क मुख्यमंत्र्याच्या सदिच्छा भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.