23 मार्च रोजी डाक विभागाच्या विविध योजनांचा भव्य मेळावा





23 मार्च रोजी डाक विभागाच्या विविध योजनांचा भव्य मेळावा

ऊर्जानगर तसेच चंद्रपूर शहरातील नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर पोस्टल विभागातर्फे दि. 23 मार्च 2022 रोजी कामगार कल्याण मनोरंजन केंद्र मार्केटसमोर सिटीपिएस वसाहत येथे डाक विभागाच्या विविध योजनांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये आधार सेवा, इंडिया पोस्ट पेमेंट बँक (नवीन खाते उघडणे, आयपिपीबी (IPPB) खाते त्यांच्या पोस्ट ऑफीस बचत (POS8) खात्याशी जोडणे, AEPS पैसे काढणे, आधार नुतनीकरण प्रधानमंत्री जिवन ज्योती योजनेत नाव नोंदणी आदी.) करण्यात येणार आहे. त्यासोबतच पोस्ट ऑफीस बचत खाते प्रधानमंत्री जिवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना, माय स्टॅम्प, नवीन पोस्टल विमा तसेच ग्रामीण विमा योजना, गंगाजल विक्री या योजनांचा समावेश आहे.

ऊर्जानगर तसेच चंद्रपूर शहरातील सर्व नागरिकांनी आपले ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड), निवासी पुरावा व 2 पासपोर्ट साइज फोटोसह सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपस्थित राहावे. आणि डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून केले आहे.


(