स्व. रमेश परमदास नन्नावरे मृत्यू प्रकरणातील मुख्य मोरक्याला अटक करा - कुंठुबीयांची मागणी



स्व. रमेश परमदास नन्नावरे मृत्यू प्रकरणातील मुख्य मोरक्याला अटक करा - कुंठुबीयाची मागणी


दिनचर्या न्युज 

चंद्रपूर :- 

कोरपणा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा पारधीगुडा येथील नामे स्व. रमेश परमदास नन्नावरे वय 38 जात पारधी हा आपल्या परिवारासहित राहत होता, मृतकाला तिन मुली व एक मुलगा असुन त्याची पत्नी हि मृतकाला सोडून आठ महिन्या अगोदर गावातीलच अश्विन रुषीदास नन्नावरे या इसमा बरोबर पळुन गेली होती. फेब्रुवारी महिण्याच्या पहिल्या आठवड्यात ती आठ महिने परराज्यातून घरी परतली, तेव्हा विलास राऊत याने आपल्या शेतातील गोठ्यामध्ये तिला ठेवले नंतर ती गावात आली तेव्हा गावातील पुढारी लोकांनी तिचा विरोध केला होता, तसेच कुटुंबियांनी लहान मुलांचा विचार करून तिला स्विकारले परंतु मृतकाची पत्नी नामे सुरेखा रमेश नन्नावरे हिच्या मनात काही वेगळेच होते, दि. 15/03/2022 ला मृतक व त्याच्या पत्नी मध्ये आपसात भांडण झाल्याचे शेजारी सांगतात. त्याच भांडणाचा राग मनात ठेवून सुरेखा हिने दि. 16/03/2022 ला रात्री 11.30 वाजताच्या सुमारेस झोपेतच रमेश नन्नावरे चा गळा दाबून खुन केला आणि रमेशला जिवणातुन संपविले आहे, असा आरोप मृतकाचा भाऊ विजय नन्नावरे ने केला आहे.

मृतक रमेशला तीन मुली एक लहान मुलगा असून  लहान मुलाने ह्रदयस्पर्शी दृश्य डोळ्यांनी पाहिले असता. तो म्हणाला की, माझ्या  आईने माझ्या वडिलांना तोंड दाबून  त्यांच्या तोंडावर उशी ठेवून मारले असे बोबड्या बोलात छत्रहरवलेल्या मुलाने आज पत्रकारांसमोर पाहिलेले कृत्य सांगितले

पत्रकार परिषद आदिवासी पारधी विकास परिषदेचे अध्यक्ष  धर्मेश शेरकुरे, रवींद्र ननावरे, रमेश ची आई, विजय प रमदास नन्नावरे, सुधाकर पवार, ज्ञानेश्वर घोसरे, यांची उपस्थिती होती.
कोरपणा तालुक्यातील धोपटाळा पारधी  येथील स्व. रमेश परमदास नन्नावरे याच्या मृत्यू प्रकरणी त्यांची पत्नी नामे सुरेखा नन्नावरे व तिचे साथीदार विलास राऊत व अश्विन नन्नावरे व तिचा भाऊ रविन्द्र पवार यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल   करावा अशी मागणी पत्रकार परिषदेतून  परिवारा कडून करण्यात आली.




मृतकाची पत्नी सुरेखा ननावरे सोबत, धोपटाळा  कोरपणा येथील विलास राऊत, अश्विनी राऊत
  याचे अनैतिक संबंध प्रस्थापित होते. विलास राऊतने   सुरेखा व  अश्विनला पळुन जाण्यासाठी सहकार्य केल्याचे मोबाईल वर संभाषण रेकॉर्ड आहे, असा  आरोप विजय ननावरे ने केला आहे.  ती पळून गेल्याने रमेश खुप दुखावला होता.  त्याचा आई नामे कमलबाई व भाऊ विजय परमदास नन्नावरे यांनी त्याच्या कुटुंबाला आधार दिल्ल होता. ज्यादिवशी रमेशचा खून झाला होता दि. 16/03/2022 त्या रात्री  अश्विन शिवारातच होता असे गावक-यांचे म्हणने आहे. अश्विन सोबत संपर्क साधला असता चामोशीला असल्याचे सांगितले आणि लगेच अंतविधी संपताच तो गावाला का हाही प्रश्न उत्भवतो आहे, याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे .त्याच खुनाला  कारणीभूत अशा निर्दयी सुरेखा रमेश नन्नावरे व तीचे साथीदार विलास राऊत  तिचा प्रियकर नन्नावरे व रविन्द्र रामचंद्र पवार यांची सखोल चौकशी करून यांचेवर खुनाचा गुन्हा कर करावा तसेच त्यांना अटक करून तुरुंगात    टाकावे अशी मागणी आज  झालेल्या पत्रकार   परिषदेतून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.