चंद्रपुरात उष्माघाताने इसमाचा मृत्यू!
चंद्रपुरात उष्माघाताने इसमाचा मृत्यू!

चंद्रपूर
दिनचर्या न्युज:-

चंद्रपुरात आज उष्णतेने आपला रुद्र रूप धारण केले आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने चंद्रपूर शहरातील दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडले आहेत. यातच आज चंद्रपूर येथील महाकाली मंदिर परिसरात नदीच्या पुलावर ठाकूर नावाच्या व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. सूत्राच्या माहितीनुसार हा इसम गुटकाळा परिसरातील असून याचे काही नातेवाईक महाकाली परिसरात असल्याने तो या परिसरात यायचा अशातच वाढत्या उष्णतेमुळे त्याला पाणी न मिळाल्याने, तो जागीच पडून राहिला. नागरिकांनीही त्याच्याकडे मद्यप्राशन केले असल्याने तो पडून आहे असे समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले म्हणून त्याचा नाहक बळी गेला असल्याची चर्चाही सुरू आहे.
चंद्रपूर शहरातील नागरिकांना आव्हान आहे की, उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुठलाही व्यक्ती कुठे पडून असेल त्यांनी माणुसकी म्हणून त्याला सर्वप्रथम पाणी पाजून आरोग्य विभागात दाखल करण्याची जबाबदारी पार पाडावी. बरेच या व्यक्तींना मध प्राशन केल्याने पडल्या गेल्या असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्या जातात. आणि अशातच एखाद्या व्यक्तीचे प्राण जातो. म्हणून आपण आपली जबाबदारी म्हणून अशा व्यक्ती कडे दुर्लक्ष न करता. माणूस म्हणून एक कर्तव्य करावं!