वजन माफ कार्यालयातील निरीक्षक स्थानिक न राहता उचलतात घरभाडे!वजन माफ कार्यालयातील निरीक्षक स्थानिक न राहता उचलतात घरभाडे!


दिनचर्या न्युज :-

नागभीड :-                                            
शासनाने जिल्हा तालुका स्तरावर अन्न  नागरीक पुरवठा   व ग्राहक संरक्षण  कार्यालयात निरीक्षक नियुक्‍ती करण्‍यात आले आहेत. मात्र अनेक कार्यालयात वजनमाप अधिकारी निरीक्षक हे नाम मात्र पद सूत्रधार आहेत. शासनाची दिशाभूल करून लाखो रुपये  वर्षाला  घर भाडे  स्वरूपात उचलत असतात. शासन  निर्देशानुसार संबंधित अधिकाऱ्यांना   आपल्या सेवारत असलेल्या ठिकाणी  असल्याचे  दाखवून शासनाचा अतिरिक्त घरभाड्याच्या स्वरूपात मिळणारा पैसा हळपला  जातो.   एवढेच  नाहीतर शासनाकडून मिळणारा टि ए ,डी ए, यावर सुद्धा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे भासवुन दौर्‍यात  त्यातून मिळणाऱ्या पैशाचा  वापर करतात.
अनेक तालुक्यातील अधिकारी हे जिल्ह्याच्या ठिकाणी राहून घरभाडे उचलतात.
असाच प्रकार नागभीड येथील वजन माप निरीक्षक अधिकारी मेश्राम हे नागपूरला वास्तव्यात असतात मात्र ते नागभीड ला असल्याचे भासवून अशाच प्रकारचा गोरख धंदा  करीत असल्याचे चर्चिले जात आहे.  नागभीड येथील वजन मापन निरीक्षक कार्यालय हे शोभेची वस्तू बनलेले आहे. या ठिकाणी येणारा व्यापा-याना  अनेक वेळा कार्यालय बंद असल्यामुळे आल्या पावली परत जावे लागते. या कार्यालयासी संमधीत  चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी या तालुक्यांचा समावेश आहे. मात्र येथिल अधिकारी या कार्यालयात  अमावस्या, पौर्णिमाला येत असल्याची खंत नागरीकात केली जात आहे.   कार्यालयात विचारपूस केली असता अनेक वेळा   कॅम्प शिबिर असल्याचे सांगीतले जाते.   कॅम्प शिबिरे  कुठल्या ठिकाणी आहेत ,असे कुठेही नोंद केली नसते. फक्त व्यापाऱ्यांना   वेड काढू पणा धोरण अवलंबण्यासाठी अशा प्रकारचे   शिबिराच्या नावाने खोटारडे  पणा केला जातो. खरंतर या ठिकाणी कार्यालयाच्या मुख्य दर्शनी भागावर संबंधित अधिकार्‍याचे मोबाईल नंबर, व कुठल्या ठिकाणी जायचे आहे असे दर्शवले पाहिजे. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे असे दर्शनी भागावर लिहील्या गेलेली  नोठ आढळून येत नाही.
याच निरीक्षकाकडे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील  कारभार   सोपवण्यात आला आहे.   असे स्थानिक चौकशी केली असता  माहिती मिळाली आहे. मात्र जिल्ह्यात अशा प्रकारच्या अनेक  कार्यालयाच्या ठिकाणी निरीक्षक अधिकारी नाम मात्र असून अनेक ठिकाणचे कार्यालय हे शोभेचे वस्तू बनले असल्याची खंत नागरिकात व्यक्त केली जात आहे. यासाठी शासनाने अशा अधिकारावर लगाम लावण्याची गरज असून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून दूर करण्यात यावे अशी मागणी आता व्यापारी वर्गाकडून होत आहे.  क्रमशा!...