आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री चे निधन




आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री चे निधन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांची त्यांचे मातोश्री श्रीमती गंगुबाई जोरगेवार यांचे आज दीर्घ आजाराने सकाळी निधन झाले. त्यांची ओळख म्हणजे चंद्रपुरात अम्माचा टिफिन नावाने अत्यंत गरजू लोकांना अन्नदान करण्याचे काम आ. किशोर जोरदार यांनी सुरू केले. मुलगा आमदार झाला म्हणून त्यांनी आपला पिढी जात व्यवसाय सुरूच ठेवला होता. कुठलाही गर्व न करता त्या शेवटपर्यंत महानगरपालिकेच्या सात मजली बिल्डिंग समोर आपला टोपल्या विकण्याचा व्यवसाय करीत होत्या. आज त्या या जगात नसल्या तरी, त्यांनी आपल्या मुलावर केलेले संस्कार फार मोठे आहेत. त्यांच्या मागे दोन मुले मुलगी आणि भरभरून नातवंड असा फार मोठा जोरगेवार कुटुंब असून त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर प्रदान करो.
त्यांची अंत्यविधी उद्या सकाळी शांतीधाम वर होणार आहे.