अपघातात रोशन चौधरी याचा मुत्यू, दुर्दैवी घटनेनी भिवापूर वार्डात शोककळा!




अपघातात रोशन चौधरी याचा मुत्यू, दुर्दैवी घटनेनी भिवापूर वार्डात शोककळा!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्ड येथील रहिवासी रोशन राजेश‌ चौधरी (वय २४)यांचा कोठारीजवळील ताजगाव येथे काल शुक्रवार दि. ६ में रोजी दुचाकीने अपघात झाला. यात रोशन चौधरी याचा जागीच मृत्यू झाला असून एका लग्न समारंभ च्या कार्यक्रमानिमित्त राजेश कोठारी येथे आपल्या दूचाकीने गेला होता. कोठारीनजिक चार चाकी वाहनांच्या धडकेत राजेश चा जागिच मृत्यु झाला. मिळालेल्या माहितीनुसार कोठारी पो. स्टे. येथे गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आहे. या संदर्भात वृत्त लिहीस्तोवर घटनेबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती कोठारी पो. स्टे. मधून मिळाली नाही. महत्वाचे म्हणजे मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा रोशन यांच्या मृत्युने चौधरी कुटुंबियांवर दु:खाचे स़ंकट कोसळले आहे. दोन वर्षापूर्वी रोशनचे वडील मोलमजुरी करणारे राजेश यांचा शासकीय इमारतीत कंत्राटी कामावर असतांनाच इमारतीवरून कोसळून दुर्देवी मृत्यु झाला होता. त्यानंतर आता रोशन याच्या अपघाती मृत्यूने चौधरी कुटूंबियांवर दु:खाचे संकट कोसळले आहे. रोशन ची आई उमा ही सुद्धा मोलमजूरी करून‌ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. आज शनिवार दिनांक 7 मे रोजी रोशन याच्यावर यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून त्याच्या पाठीमागे आई व मोठा भाऊ असे कुटुंब आहे.
अपघातात रोशन चौधरी याचा मुत्यू झाल्याने या दुर्दैवी घटनेनी भिवापूर वार्डात शोककळा पसरली आहे.
चौधरी कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच वार्डवासीयांन कडून भावपूर्ण श्रद्धांजली .