गडचांदूर भाजपतर्फे न.प.समोर ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण
गडचांदूर प्रतिनिधी :-
गडचांदूर येथील जनतेच्या विविध मागण्यांसाठी नगरपरिषदेत विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांच्या नेतृत्वात 13 एप्रिल रोजी नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता.त्यावेळी यातील बहुतेक मागण्यांची पूर्तता येत्या 10 दिवसात करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.त्याप्रमाणे बरेचस्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या.परंतू थकबाकी मालमत्ताकर व पाणीपट्टी करावर लावण्यात 2% दंड(शास्ती)रद्द करण्यात आला नाही.तसेच पंतप्रधान आवास योजनेची उर्वरित रक्कम लाभार्थांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही.सदर दोन्ही महत्वाच्या मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नसल्याने शेवटी 18 मे रोजी नगरपरिषदे समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.19 मे पासून आमरण उपोषण करण्यात येणार असून जोपर्यंत मागण्या पुर्ण होणार नाही,तोपर्यंत उपोषण मागे घेतल्या जाणार नाही,असा निर्धार उपोषणकर्ते प्रशांत खाडे अध्यक्ष भाजपा दलित आघाडी,व बबलू रासेकर शक्ती केंद्र प्रभारी यांनी व्यक्त केला आहे.तर यावर कुठला तोडगा काढला नाही तर या पेक्षा मोठे आंदोलन करण्याचा ईसार उपस्थित नगरसेवक अरविंद डोहे व भाजपा शहर अध्यक्ष सतीश उपलेंचिवार यांनी यावेळी दिला.याप्रसंगी शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार, नगरसेवक अरविंद डोहे, नगरसेवक रामसेवक मोरे, आमरण उपोषण कर्ते प्रशांत खाडे, बबलू रासेकर,अरविंद कोरे, राकेश अरोरा, सत्यदेव शर्मा, कुणाल पारखी, सुयोग्य काँगरे,बंटी गुरनुले, हरी कुसले अशोक दरेकर, विवेक खैरे, गणपत तुरानकार, विनाबाई खंडाळकर, लताबाई खैरे, इंदिरा बोरकर, अनिताताई पंचकुटी सूनंदा गिलबिले , रमाकांत काळे, शिवा सिडाम ,अनिल सिडाम शुद्धोधन खैरे ,गुलाब जिवने इत्यादी उपस्थित होते.
दिनचर्या न्युज