राज्यातील ओबीसींची जनगणना होणे आवश्यक-कल्याण दळे
ओबीसी महासंघाच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचा सूर
दिनचर्या न्यूज:-
कुडाळ :-
महाराष्ट्राचा खुंटलेला विकास करायचा असेल तर, शासनाने बहुजन समाजाच्या ओबीसींना आरक्षण देणे आवश्यक आहे. सरकारने आरक्षण दिले तर विकास करण्याचे हे काम आपण केले पाहिजे. यासाठी सर्व ओबीसींची सरकार मार्फत जनगणना व्हायला हवी, असे मत महाराष्ट्र ओबीसी समाजाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी येथे केले. कुडाळ
महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य कार्यकारिणी व ओबीसी महासंघाचा राज्य मेळावा, कुडाळ येथे राज्य संघटक विजय चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली व बारा बलुतेदार महासंघ तथा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणजी दळे व भंडारी समाजनेते नवीनचंद्र बांदीवडेकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी दळे बोलत होते. ते म्हणाले, नाभिक समाजाने उच्च शिक्षीत व्हावे.
ज्ञाती विद्यार्थ्यांनी उच्च पदस्थ अधिकारी बनावे. तसेच उद्योग धंदे करून आपली आर्थिक परीस्थिती सुधारावी. यामुळे ओबीसी महामंडळाची सर्वार्थानि ताकद वाढेल. नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी आपले विचार मांडले. अनिल अणावकर यांनी प्रस्तावना केली तर अध्यक्षीय भाषणातुन विजय चव्हाण यांनी नाभिक संघटन वाढवण्याचे आवाहन केले.
यावेळी महामंडळाच्या संघटन व विकासात्मक बाबींवर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्याबाबत मार्गदर्शन व चर्चा झाली. समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी झालेल्या सभेत अनुसूचित जाती आरक्षणाच्या बैठकी बाबत माहिती दिली. भाई कोतवाल स्मारका विषयी राज्यातील प्रमुखांशी महत्वपुर्ण चर्चा झाली. सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. येत्या महीन्याभरात, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला शासनाकडून मंजुरी मिळेल. या महामंडळाकडून ओबीसी समाजातील व्यवसायीकांना नवीन व्यवसायासाठी १५ लाखां पर्यंत कर्ज मिळेल. नाभिक समाजातील थोर व्यक्तींच्या जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजच्या करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा तसेच बारा बलुतेदारांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय विषयावरज्ञाती विद्यार्थ्यांनी उच्च पदस्थ अधिकारी बनावे. तसेच उद्योग धंदे करून आपली आर्थिक परीस्थिती सुधारावी. यामुळे ओबीसी महामंडळाची सर्वार्थानि ताकद वाढेल. नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी आपले विचार मांडले. अनिल अणावकर यांनी प्रस्तावना केली तर अध्यक्षीय भाषणातुन विजय चव्हाण यांनी नाभिक संघटन वाढवण्याचे आवाहन केले.
ओबीसी बहुजन नेते तथा नाभिक महामंडळाचे कार्याध्यक्ष दामोधर बिडवे, बारा बलुतेदार व मागास प्रवर्गाचे केले.
उपाध्यक्ष दत्तात्रय चेचर, नाभिक मंडळ राज्य सरचिटणीस राजन पवार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, गोवा राज्य अध्यक्ष लाडु सुर्लकर, म्हापसा येथील नाभिक कार्यकर्ते दिलीप चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश पिंगुळकर, सचिव सुधीर चव्हाण, प्रविण कुबल, कुडाळ अध्यक्ष आनंद पिंगुळकर आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी व नाभिक बंधु भगिणी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक प्रवीण कुबल व बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवदास ढोलेकर यांनी केले.