डब्लू सी एलच्या अडेलतट्टू धोरणामुळे नदीतील नैसर्गिक संपत्तीचा-हास!
डब्लू सी एलच्या अडेलतट्टू धोरणामुळे नदीतील नैसर्गिक संपत्तीचा-हास!

ईरई नदीचे अस्तित्व धोक्यात!


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील लालपेठ खुली कोळसा खदान या खदानीच्या आजूबाजूला मातीच्या ढिगाळे टाकण्यात आले आहेत. यांना डंपिंग एड बनवण्यात आले होते. मात्र हे ढिगाने इरई नदीच्या पात्रात असल्यामुळे इरई नदी त्यात भविष्यात अस्तित्वात राहिल
की नाही असा प्रश्न आता नागरिकात उपस्थित होत आहे.
लालपेठ डब्लू सी एल कोळसा खदानीच्या हद्दी मध्ये ईरई नदीचे पात्र वाहत आहे. मात्र काही वर्षापासून या ठिकाणचे ढिगाळे बाजूला करून त्या ठिकाणी असलेली रेती उपसण्याचे सर्रास रेती माफिया चे काम सुरू आहे. मात्र याकडे. डब्लू सी एल च्या कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नाही. भविष्यात नदीचे पात्रच गायब होण्याच्या मार्गावर असून चंद्रपूर शहराला याचा जोरदार फटका बसून शहर पुराच्या खाली जाईल याची भिती नाकारता येत नाही.  या नदीपात्रातून जाणारे पाणी हे डब्लू सी एल च्या माना ओपन खुल्या  खड्ड्यात जात असून तेथील पाण्याचा उपसा  डब्ल्यूसीएल  करीत आहे. या नदीच्या पात्रात होत असलेले उत्कखलन याचे सर्वस्वी जबाबदार लालपेठ खुली कोळसा खदान असेल भविष्यात मोठी जीवित हानी,नदी-हास झाली,तर  याला जबाबदार  लालपेठ खुली कोळसा खदानीचे संपूर्ण अधिकारी  असतील. नदीपात्राच्या अंतर्गत भागात संपूर्ण खोदकाम केल्या गेल्यामुळे नदीचे प्रवाह  धोक्यात आले आहे. डब्लू सी एल च्या अधिकार्‍यांना याची माहिती देऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी अडेलतट्टूची भूमिका घेतली असून याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र भविष्यात निसर्गाला  डवचने हे किती महागात जाईल याचे चित्र आता पासूनच डब्लू सी एल च्या अंतर्गत असलेल्या ईरई नदीच्या पात्रात दिसून येत आहे.  
एवढेच नाही तर जिल्हातील पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याने या नदीत होत असलेल्या  पाण्याच्या प्रवाहाची पाहणी करून संबंधित दोषी असणाऱ्या वर कारवाई करावी. जिल्ह्यातील भूजल संरक्षण अधिकाऱ्यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यात होत असलेल्या उत्खनना संदर्भात लक्ष देण्याची गरज आहे. सर्वात जबाबदार असणारे जिल्ह्यातील महसूल विभाग हे मात्र डोळ्यावर पट्टी बांधून त्याची भूमिका घेत असल्याचे अनेकदा दिसून येत आहे.


दिनचर्या न्युज :-