भद्रावती तालुक्यातील अकरा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा - ग्रामस्थांनाची मागणी




भद्रावती तालुक्यातील अकरा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा - ग्रामस्थांनाची मागणी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
जिल्ह्यातील भद्रावती तालुका येथील प्रकल्पग्रस्त गावातील शेतकरी व भूमिहीन होणाऱ्या नागरिकांना योग्य मोबदला देण्यास यावा अन्यथा प्रकल्पग्रस्त अकरा गावातील नागरिकाकडून जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे.
मे अरविंदो रियल्टी अंॅड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे तालुक्यातील 11 गावामध्ये ही कंपनी प्रस्थापित होत असून 936 हे. आर. जमीन ही भूमिगत खाणीसाठी अधिग्रहीत होत असून योग्य भाव देण्यात यावा. बेलोरा टाकळी या गावाचे पुनर्वसन होत असून येथील प्रत्येक घरांना दोन हजार स्केअर फुट जागेची मागणी करण्यात आली आहे. सहा ग्रामपंचायत मधील जवळपास अकरा गावातील प्रकल्पग्रस्त नुस्कान होणार आहे. जोपर्यंत या गावांना योग्य मोबदला मिळणार नाही. तोपर्यंत या प्रकल्पग्रस्त  गावातील  नागरिकाचे  विरोध सुरू राहणार आहे.  प्रकल्पग्रस्त यांना शैक्षणिक योग्यतेनुसार   रोजगार देण्यात यावा, भूमिहीन, शेतमजूर, शेती संबंधित गावात काम करणाऱ्या बारा बलुतेदारांना रोजगाराची तरतूद करण्यात यावी. प्रकल्पग्रस्त भूमिहीन शेतकऱ्यांना   हेक्टर मागे 1 करोड रुपये देण्यात यावी. 75 लाख शहरी, व ग्रामीण ला 40 लाख  देण्यात  आले होते. कंपनीकडून मल्टी  स्पेशालिस्ट हॉस्पिटलची  तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी. प्रकल्पग्रस्त  कुटुंबातील शेतकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा द्यावी. वृक्ष लागवड करून, खनिज  विकास निधीचा हा पूर्णपणे बाधित गावाकरिता वापरावा अशा अनेक मागण्या     पत्रकार परिषदेत उपस्थित  अंकुश आगलावे, बेलोरा  सरपंच संगीता देहारकर, उषा पंडीले, आनंद देहारकर , प्रविण  मते, काकडे,  जगताप, यांनी केला आहे.