सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात राजकीय पक्षाचा राडा !




सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात राजकीय पक्षाचा राडा !


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेष्ठ हाऊस(निवास स्थान) विश्रामगृह हे आजकाल सर्वच राजकीय पक्षाच्या चर्चासत्राचे कार्यालय झाले ,असून या ठिकाणी सर्वसामान्यांपासून सामाजिक ,राजकीय किंवा एखाद्या सर्वसामान्याचे स्वागत समारंभ किंवा सभा बैठका,समारंभासाठी उपलब्ध असलेले रेस्ट हाऊस झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून मागेल त्याला रेस्ट हाऊस देण्याचा सपाटा सा.बा.अभियंत्याने सुरू केला आहे. या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाचे बैठका, कार्यकर्ता मिळावे, याच रेस्ट हाऊस मध्ये होत असताना पावयास मिळत आहे. अनेक पुढाऱ्याच्या नावाने गेस्ट हाउस बुक करून कोणीही त्याचा वापर करीत असून याकडे सर्रास सार्वजनिक बांधकाम विभागाचे  अभय मिळत आहे.  याच रेस्ट हाऊस मध्ये मागील काही महिन्यापासून  कुठल्यातरी कंपनीचा एक ठेकेदार एक महिन्यापासून आश्रयास असून याकडे सुद्धा या विभागाचे दुर्लक्ष होत आहे.  नियमानुसार साहा दिवसाच्या आत. रूम खाली करावी लागते.   पण येते असे होताना दिसत नाही  .
एवढेच नाही तर काल झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हा बैठक  जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगर परिषद, नगरपंचायत , महानगरपालिकेच्या निवडणुका यासंदर्भात काल मनसेच्या वतीने   घेण्यात आली . या बैठकीत आपसी वादातून काल कार्यकर्त्यात चांगलाच राडा झाल्याची खमंग चर्चा असून ही चर्चा  सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
सर्वच राजकीय पक्षाच्या राजकारणात गटबाजीचे राजकारण असून प्रत्येक जण आपल्या अस्तित्वासाठी  राजकारण करीत असतो . त्यातलाच हा एक भाग असावा समजावा?

सार्वजनिक   बांधकाम विभागाचे विश्रामगृह चे नियम धाब्यावर बसून मागेल त्याला रूमवर उपलब्ध होत असून.
   शासकीय  विश्रामगृहाचे    नियमावली  ही विश्रामगृहाच्या दर्शनी भागावर लावल्या जाते इथे तसे काही नाही. कुठला  अधिकाऱ्याला किंवा संबंधित   राजकीय पुढाऱ्यांना , शासनाने ठरवून दिलेल्या व्यक्तींना  विश्रामगृहातील रूम देण्यासंदर्भात दर्शनी फलक लावले जाते. मात्र चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  विश्रामगृहात कुठल्याही प्रकारचे नियम लावून दिसत नाहीत.