डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार अनंतात विलीन, हजारोंनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली!
लोकनेते आ.मुनगंटीवारांचे पितृछत्र हरपले
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्द डॉक्टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे काल शुक्रवारला( 3 जुन) रोजी सायं.7.14 वाजता निधन झाले. नागपूर येथील किंग्जवे या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या मृत्यमुळे एक तळपता सूर्य मावळला आहे.
डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो संख्येने आलेल्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अनेक राजकीय नेत्यांच्या उपस्थित डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार हे अनंतात विलीन झाले.त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे मृत्युसमयी 91 वर्षाचे होते. हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष, चिन्मय मिशनचे अध्यक्ष, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदा-या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या.
अत्यन्त शिस्तप्रिय व्यक्तिमत्वाचे धनी असलेले डॉ.मुनगंटीवार अनेकांसाठी प्रेरणास्थान तर होतेच त्यातच त्यांचा स्वाभिमानी व सहज स्वभाव नेहमीच चर्चेत राहिला.साधी राहणी उच्च विचारसरणीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्व.डॉ मुनगंटीवार.दुसऱ्यांचे जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने उजळणे,असाच त्यांचा जीवन प्रवास.सर्वांना ऊर्जा देणारा हा तळपता सूर्य आता मावळला आहे.विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्यांचे कनिष्ठ चिरंजीव.
स्व.डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या मृतात्म्यास ईश्वर सदगती प्रदान करो व समस्त मुनगंटीवार परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करो.हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली