पावसाच्या पुरात झरण विक्री आगारातील एफडीसीएमचे बंडल वाहून गेले, लाखोंचा फटका!





पावसाच्या पुरात झरण विक्री आगारातील एफडीसीएमचे बंडल वाहून गेले, लाखोंचा फटका!



'एफडीसीएम'ला लाखोंचा फटका; १०० बिट, बांबू बंडल वाहून गेल्याचा अंदाज

दिनचर्या न्यूज:-
कोठारी (चंद्रपूर) : वन विकास महामंडळ उत्तर चंद्रपूर विभागाअंतर्गत असलेल्या झरण आगारातील साग, आडजात बिट तसेच बांबू बंडल नाल्यात वाहून गेले असून त्यात लाखोंचा फटका बसला असल्याची माहिती आहे. ही घटना ८ ऑगस्टला सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या दरम्यानची असल्याचे समजते. दहा वर्षांतील ही दुसरी घटना असून महामंडळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे महामंडळाला लाखोंचा फटका बसला आहे.
तत्कालीन मध्य चांदा व सध्याचे उत्तर चंद्रपूर विभागांतर्गत येत असलेल्या झरण वनक्षेत्रातील आगारात कोट्यवधींची मालमत्ता विक्रीसाठी संग्रहित करण्यात आली असून त्या आगारात सागवान बिट, आडजात बिट व बांबू बंडलाचा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला आहे. दहा " वर्षांपूर्वी करंजी येथील तलाव फुटल्याने तलावाच्या पाण्याचा विसर्ग वाढला. त्यात याच वनविकास महामंडळाचे झरण आगारातील कोट्यवधींचे मौल्यवान सागवान, आडजात लाकडे, बिट, बांबू बंडल, लांब बांबू पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते.

मुसळधार पावसाने झरण डेपोतील बिट वाहून गेले आहेत. वाहून ओळखून आगार अन्य सुरक्षित जागी हलविणे गेलेले वनउपज नाल्याच्या कडेला अडकलेले असून, त्यास मजुराद्वारे गोळा करण्याचे काम सुरू आहे. गोळा झाल्यानंतर त्याची डेपोत रचना केल्यानंतर नेमके किती बिट वाहून डेपो लावला गेला. ८ ऑगस्ट रोजी गोंडपिपरी गेले, याचा अंदाज करता येईल. सध्या २० ते २५ बिट वाहून गेल्याचा अंदाज आहे.
परमेश्वर कार्नेवाड,
प्रभारी वन अधिकारी व आगार प्रमुख झरण

 यात एफडीसीएमला कोट्यवधींचा फटका बसला असताना  त्यापासून भविष्यातील पाण्याचा धोका ओळखून आगार अन्य सुरक्षित जागी हलवणे आवश्यक असताना पुन्हा तीच नजर चूक करीत या विभागाचे अधिकारी, कर्मचारी गाफील राहुल परत चार प्रवाहाच्या वाटेवर  आगार डेपो लावला गेला. आठ ऑगस्ट रोजी गोंडपिपरी तालुक्यातील गणपुर, झरण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जंगलातील डोंगरातून प्रचंड पाण्याचा प्रवाह वाढला. त्यात गणपुर नाल्यातून पूर परिस्थिती निर्माण होऊन चार तास कोठारी गोंडपिपरी रहदारी खोळंबले गेली होती.
 प्रचंड पाण्याचा प्रवाह वाढल्याने झरण आगारात पाणी शिरले व त्यातील वन उपज तरंगून प्रवाहसोबत वर्धा नदीकडे वाहून गेले. त्यात महामंडळाचे १०० ते १५० बिट व बांबू बंडल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. वाहून गेलेले वनउपज नाल्याच्या शेजारी काही प्रमाणात अडकले आहेत. त्यास जमा करण्याचे युद्धस्तरावर काम सुरू असून परत बिट रचल्यानंतर किती बिट वाहून गेले याबाबत माहिती प्राप्त होऊ शकते. दहा वर्षांपूर्व याच डेपोतून लाखोंचा वनउपज वाहून गेला तरीही त्यापासून धडा घेण्याऐवजी परत त्याच चुकीची पुनरावृत्ती करीत लाखो रुपयांचा फटका बसला आहे.