राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भिसी शहरात महात्मा गांधी व स्व. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती, एक तास राष्ट्रवादी साठी ....!




राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भिसी शहरात महात्मा गांधी व स्व. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती, एक तास राष्ट्रवादी साठी ....!

दिनचर्या न्युज :-
भिसी :-
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी शहरात आज पूज्यनीय राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती आणि मा. प्रांताध्यक्ष आ.श्री.जयंत पाटीलसाहेब यांच्या आदेशान्वये "एक तास राष्ट्रवादी साठी ..... या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.*
*पूज्यनीय महात्मा गांधी आणि स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त भीसि शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पदयात्रा काढून महात्मा गांधी यांच्या बाजार चौकातील पुतळ्याला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली.भिसी येथील गांधी चाळ येथील पुतळ्याला सुद्धा जेष्ठ नेते मा. श्रीनिवासजी शेरकी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, सोबत बाजार चौकातील भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सौ. छायाताई अरविंद रेवतकर यांच्या यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, त्यानंतर तालुक्यातील आणि विशेषतः भिसी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, अरविंद भाऊ रेवतकर रा. कॉ. जिल्हा सरचिटणीस चंद्रपूर, मा. राजू भाऊ मुरकुटे रा. कॉ. तालुका अध्यक्ष चिमूर, श्रीनिवासजी शेरकी, सौ.अविषा ताई रोकडे, किशोर भाऊ गभने नवनियुक्त रा. कॉ. भिसी शहर अध्यक्ष, हनुमंतजी गेडाम सर यांनी उपस्थितांशी संवाद साधला,आणि मार्गदर्शन केले,या प्रसंगी राजेंद्र वैद्य यांनी सभासद नोंदणी, आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि भिसी नगर पंचायत निवडणूक तसेच पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत मर्गरशन केले. या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.आनंद अडबाले, शरद मानकर माजी जि.प.सदस्य, प्रकाश पोतराजे माजी पं.स.सदस्य, भाऊजी नागोसे जांभूळघाट, कवडूजी यादव टीटवी, विजय मातने, सौ. जयमाला बोरकर सरपंच गडपिपरी, हरडे मॅडम उपसरपंच गडपिपरी, सोयाम मॅडम डोंगर्ला, रमेशभाऊ घोडमारे, सचिन जांभूळे, विजय घरत सरपंच कन्हाळगाव, गोविंद दडमल सिरसपुर, ललित हरडे, गजानन राऊत पुयारदंड, सोमा दडमल कपर्ला, जनिक सोयाम सावर्ला, तसेच भिसी येथील जेष्ठ कार्यकर्ते दिगंबरजी खोब्रागडे, खटुजी रंदई, काकाजी नागपुरे, भाऊरावजी नरड, दिनेश दिघोरे, रामचंद्र दिघोरे, मनोज दिघोरे, धनराज दिघोरे, देवा घुटके, जगत तांबे, संतोष मुरकुटे, सुखदेव धानफोले, सूर्यभान नवनागे, रवी बोरकर, राजू बोरकर, उमेश बेलखोडे, सुमित कांबळे, संभा कुमले, नारायण कामडी, अमृत बनसोड, अक्षय खवसे, पंकज रेवतकर, रवींद्र सूर्यवंशी, राजू मेश्राम, लटारू मेश्राम, अरविंद भूजाडे, दिवाकर दिघोरे, नारायण बावणे, अनिल शेंडे, नरेश कडवे, विजू नन्नावरे, हरी मोहिणकर, बालू पाटील ठाकरे, शिवसागर गेडाम, सूरज लोखंडे, हरीश डुकरे , अरुण पोपटे, रोशन गिरडे, नारायण कांडरकर, सागर कांडरकर, पिंटू खवसे, शुभम सहारे, सौरभ कामडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्त्या सौ. छायाताई रेवतकर, किर्ती गभने, रोकडे मॅडम, हरडे मॅडम, बोरकर मॅडम, कल्पना शंभरकर, करिश्मा गभने, पचारे मॅडम, रीना लोहकरे, पिसे मॅडम, ढोक मॅडम, या असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.आभार प्रदर्शन श्री.अहमद शेख यांनी केले.*