गोंडपिपरी नगरपंचायत मध्ये काम करीत असलेल्या कामगारांची पिळवणूक थांबवा - सुरज ठाकरे
गोंडपिपरी नगरपंचायत मध्ये काम करीत असलेल्या कामगारांची पिळवणूक थांबवा - सुरज ठाकरे

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी नगरपंचायत अंतर्गत मागील सात वर्षापासून काम करीत असणाऱ्या सफाई कामगारांना अचानक पणे कामावरून काढून टाकले. गेल्या दोन वर्षापासून कामगारांच्या बाबतीत उदासीन तास सुरू असल्याने या काही कामगाराने आपले वेतन वाढण्यासाठी नगरपंचायत कडे मागणी केली होती. गोंडपिपरी नगरपंचायत मध्ये सफाई कामगार अंदाजे चाळीस लोक काम करीत असून त्यातील मात्र सात कामगारांना हेतू पुरस्कार काढून त्यांच्यावर सातत्याने अन्याय केला जात असल्याची बाब आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कथन केली. यासंदर्भात माहिती देताना जय भवानी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे म्हणाले की, कामगारांच्या पिळवणूक संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे आतापर्यंत 10 पत्र देण्यात आले. मात्र आतापर्यंत जिल्हाधिकार्यालय तून कुठलेही उत्तर मिळाले नाही. कामगारांना कामावरून का काढण्यात आले यासंदर्भात नगर पंचायतला कुठलीही ठोस माहिती देत नाहीत. या अगोदर या कामगारांनी आत्महत्या सारखे पवित्र ही घेतली होती . तरीपण या कामगारांना आतापर्यंत यांना मिळालेला नाही. एवढेच नाही तर जिल्ह्यात समस्त कामगारांची पिळवणूक नगरपरिषद, महानगरपालिका त्यांच्या माध्यमातून होत आहे. प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन व दिलेल्या निवेदन चे स्मरण पत्र देखील दिली जात आहे. कुठलीही दखल घेतली जात नाही. गोंडपिपरी नगरपंचायत मध्ये या आधी कामगारानी हातआशेने अखेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे या कामगारांची गोंडपिपरी नगरपंचायत आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक करत असल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगितले. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार त्यांच्याबरोबर बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत सुरज ठाकरे, आदित्य भाके, आशिष यमदुलवार, काशिनाथ ईटेकर, रवींद्र गेडाम, संतोष गोलीबार, यांची उपस्थिती होती.