शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात एम. एल .सी, ए .एन. सी, ज्येष्ठ नागरिकांची होतो लूट! Medical college chandrapur 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात एम. एल .सी, ए .एन. सी, ज्येष्ठ नागरिकांची होतो लूट?

दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर:-२८/१२/२०२२
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विविध समस्याचे माहेरघर बनले आहेत. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णाची हेडसाळ. औषधीचा तुटवडा. एवढेच नाहीतर आता शासकीय कर्मचारी असलेले निवृत्ती धारक नागरिक, तथा ज्येष्ठ नागरिक, ( एम. एल .सी,) अपघात विभागातह आणलेल्या रुग्णाकडून लूट केली जाते. ( ए. एन .सी) गरोदर मातांकडूनही आर्थिक लूट केली जात आहे.
या सर्वांकडून आता शासकीय रुग्णालयात वीस रुपयाच्या चिठ्ठीच्या नावावर सर्रास लूट सुरू आहे. शासकीय रुग्णालय हे गोरगरिब जनतेचा उपचारासाठी कार्यरत सरकारी संस्था असून या सरकारी मेडिकल कॉलेजला केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार गरीब रुग्णांचा सोयीसाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असते. मात्र या ठिकाणी बसलेले कर्मचारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना न जुमानता सर्रास ज्येष्ठ नागरिकांची लूट करीत आहेत.
       दैनंदिन कर्मचाऱ्यांचाही समस्या अजूनही प्रलंबित असून कर्मचाऱ्यांचे मागील दोन तीन महिन्यापासून पगार होत नसल्याने  शासकीय रुग्णालयात कंत्राटी कर्मचाा-यांची ससेहोलपट सुरू आहे. 
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व रुग्णालयातील लूट थांबवावी अशी आता नागरिकांची मागणी होत असून.
 या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना  इतरस्त हटवावे व सामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.  
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात होत असलेल्या या लुटी संदर्भात   डीन यांना विचारणा केली असता. मी नागपूरला जात असून आल्या नंतर त्या संदर्भाची चौकशी करून संबंधित किंवा कारवाई करीन असे भ्रमणध्वनीवरून माध्यमांशी बोलताना सांगितले.