श्री संत खप्ती महाराजांच्या अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील बागापूर येथील यात्रेला 12 फेब्रुवारी पासून प्रारंभ





श्री संत खप्ती महाराजांच्या अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील बागापूर येथील यात्रेला 12 फेब्रुवारी पासून प्रारंभ

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
श्रीसंत खप्ती महाराज संस्थान, तीर्थक्षेत्र बागापूर ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती यांच्या वतीने 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीत महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री महोत्सवाचे हे 97 वे वर्ष असून या ठिकाणी 5 कोटी रुपये खर्चून भक्त निवासाचे भव्य बांधकाम सुरु झाले आहे. भक्तगणांच्या देणगीतून हे बांधकाम सुरु आहे असून यात्रा कालावधीत याठिकाणी विविध धार्मिक व सेवाभावी कार्यक्रम होणार आहेत. श्रीसंत खप्ती महाराजांचा जन्म कोजागिरी पौर्णिमा 1890 - कार्तिक पौर्णिमा रोजी झाला तसेच महाराज 10नोव्हेंबर2003 (कार्तिक कृ.2) ला शिव झालेत. वय वर्षे114 त्यांनी आयुष्यात 3 शतके बघितली. सद्गुरु श्री संत खप्ती महाराज यांनी वयाच्या 17 वर्षी अरण्यात जाऊन 14 वर्ष घोर तपश्चर्या केली.पाठ ,पूजा, माळ ,जप हे कर्तव्य विना हीच त्यांची शिकवण होती. महाराजांच्या आश्रमात गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदी संतपुरुष येऊन गेले. महाराज स्वतः वनौषधीचे ज्ञानी होते. दिन-दुःखी लोकांची सेवा हेच त्यांचे ध्येय होते. असंख्य लोकांना त्यांच्या समाधीच्या दर्शनानंतर प्रचिती आल्याची उदाहरणे आहेत. यात्रेनिमित्त 12 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता कलशपूजन स्थापना व अखंड विणावादनाने या महोत्सवाचा प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी 7 वाजता श्रीं चा अभिषेक, आरती व खप्ती चालीसा होईल. सायंकाळी 6.30 वाजता श्रींची आरती, प्रार्थना तसेच रात्री 8 वाजता गुरुदेव सेवा मंडळ दिपोरी रेल्वे यांच्याद्वारे भजन होईल. 13 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता श्रीमद् भागवत पूजा प्रारंभ व श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ होईल. दररोज सकाळी व सायंकाळी श्रींची आरती, प्रार्थना व खप्ती चालीसा तसेच संगीतमय श्रीमद भागवत कथा होणार आहे. कथेचे निरुपण गुरुकुंज मोझरी येथील ग्रामगीताचार्य रायजीप्रभू शेलोटकर महाराज व संच हे करतील. 17 तारखेला दुपारी 12 वाजता विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी 1 वाजता पशुरोग निदान शिबिर व लसीकरण कार्यक्रम होईल. रात्री 8 वाजता धामणगाव येथील श्रीहरी भजन मंडळाद्वारे भजन होईल. 18 फेब्रूवारीला श्री खप्ती वैभव ग्रंथाचे सामुहिक पारायण महाशिवरात्री पर्वानिमित्त होणार आहे. 19 तारखेला पहाटे 5 वाजता ग्रामस्वच्छता अभियान व रांगोळी सजावट, सकाळी 7 वाजता सकल शांती होम –हवन होईल.सकाळी 9 वाजता श्रीसंत खप्ती महाराज यांच्या पालखीची मिरवणूक, 10 वाजता गोपाल काल्याचे किर्तन व दहीहंडी कार्यक्रम होणार आहे. याशिवाय 18 व 19 फेब्रुवारीला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा काळातील कार्यक्रमांना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप दादा अडसड, नांदुरा आमदार येंकडे, माजी आमदार अरुण अडसड, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची उपस्थिती असणार आहे. या काळात इतरही विविध सेवाभावी कार्यक्रम होणार असून या यात्रा महोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समिती  श्री खप्ती महाराज संस्थान तीर्थक्षेत्र बागापूर यांनी केले आहे.

………