चंद्रपुर- बल्लारपुरात एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ या सत्रापासून सुरू होणार-डॉ. उज्ज्वला चक्रदेव






चंद्रपूर जिल्ह्यात महिलांसाठी आनंदाची वार्ता

चंद्रपुर- बल्लारपुरात एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ या सत्रापासून सुरू होणार-डॉ. उज्ज्वला चक्रदेव

चंद्रपूर गडचिरोली परिसरातील मुलींना मिळणार कौशल्याचे धडे

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-२५/२ /२०२३
श्रीमती नाती बाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबईचे( एस एन डी टी) बल्लारपूर येथे नवीन कॅम्पस शैक्षणिक क्षेत्र 2023 ते 24 पासून सुरू होत असल्याची माहिती आज परिषदेतून विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर उज्वला चक्रदेव, कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर, विभाग प्रमुख डॉक्टर जयश्री शिंदे, व सहाय्यक कुलसचिव डॉक्टर बाळू राठोड यांनी दिली.
चंद्रपुरातील पाचवे एस एन डी टी महिला विद्यापीठ असून भारतातील सात राज्यात विद्यापीठाचे कार्यक्षेत्र सुरू आहे. महर्षी कर्वे यांनी 1916 मध्ये स्त्री शिक्षणाच्या उदात्त हेतूने विद्यापीठाची स्थापना केली.
राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार वने,सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या विशेष पुढाकाराने बल्लारपूर क्षेत्रात विद्यापीठाचे नवे कॅम्पस 50 एकर जागेत उभे राहणार आहेत. यात पाचशे कोटीचे निधी यासाठी अवलंबीला जाणार आहे. येथील महिलांच्या नैसर्गिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घटकावर काम करण्याच्या अनुषंगाने हे परिसर महत्वाची भूमिका बजावणार आहे. जिल्ह्यात महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने सोबत त्यांना शैक्षणिक सांस्कृतिक दृष्ट्या प्राप्त याकरिता माननीय मंत्री महोदयानी मोठे पाऊल उचलले आहेत.
कौशल्या आधारित आणि विद्यार्थी केंद्र अभ्यासक्रमाची निर्मिती या दृष्टिकोनातून नैसर्गिक परिस्थिती अनुसरून रोजगाराच्या आणि स्वयं सिद्ध होण्याच्या सुयोग संधी विद्यार्थ्यांना मिळून देण्याचे विद्यापीठ भूमिका करणार आहे. कौशल्य विकासासाठी तीस ते साठ तासांमध्ये(२-४ क्रेडिट) लहान अभ्यासक्रम, एक वर्षात प्रमाणपत्र, दोन वर्षात पदविका, तीन किंवा चार वर्षात पदवी, पुढे पदवीधर पदवी अशी चढती रचना उपलब्ध करून दिल्या जाईल. विविध विषयावर आधारित उद्योग यासाठी व्यवस्थापन कौशल्य विकसित करणारे बीएम एस पदवी अभ्यासक्रम सुरू होतील.
हे विद्यापीठ सुरू होण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी विनय गौडा, बल्लारपूर नगरपरिषद, जिल्हा प्रशासन आणि महिला शिक्षणाकरिता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंच करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आज पत्रकार परिषदेतून करण्यात आले.