जिल्ह्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी जनतेने सहकार्य करावे - मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन






जिल्ह्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी जनतेने सहकार्य करावे - मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-९/२ /२०२३
जिल्ह्यात हत्तीरोग ही गंभीर आरोग्य समस्या आहे. या रोगामुळे शारीरिक विकृती, अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. व रुग्ण आर्थिक, सामाजिक व मानसिक विवेचना सापडतो. व येणाऱ्या पिढीवर त्याचा दुष्परिणाम जाणवतो. सार्वत्रिक औषधोपचार मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच हत्तीरोग निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत पण त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, यांनी केले आहे.
हा आजार गढूळ पाणी, दूषित क्युलेक्स डासाच्या डंक मुळे होतो. चावल्यामुळे रुग्णाच्या शरीरातील मायक्रो फायलेरिया डास शरीरात प्रवेश करतात.
व्हचेरेरिया बॅन क्राफ्टी व ब्रुगेलिया मलाई मुळे होतो. नर व माझा कृमी असंख्य मायक्रो फायलेरिया जन्माला घालतात. याची लक्षणे दिसायला पाच ते सात वर्षे लागतात. हत्तीपाय व अंड वृद्धी आजार आजार होऊन सुजन येऊ लागते. अशावेळी रुग्णांना ताप येणे, हुडहुळी भरणे अशी लक्षणे दिसून येतात. हत्ती रोगांचे निदान हे रात्रीच्या वेळी रक्त संकलन करून सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने तपासणी केल्या जाते. याचा रुग्ण आढळून आल्यास रुग्णास टॅब. डी ईसी व टॅब अलबेंडाझोल ची एक दिवशी मात्र देण्यात येतात.
जिल्ह्यात सर्वत्र औषध उपचार मोहीम राबवण्यात येत असून चंद्रपूर जिल्हा हा हत्ती रोगांसाठी अति संवेदनशील जिल्हा आहे. 2022 च्या सर्व्हेनुसार 10380 हत्ती पाय रुग्ण तसेच 3067 अंडा वृद्धी रुग्णाची नोंद झाली आहे.
या रोगाच्या संदर्भात जनजागृती संपूर्ण नष्ट करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी मच्छरदाणीचा वापर, शौचालयाच्या वेन्ट पाईपला जाळी लावणे , अळीनाशक फवारणी, अशा प्रतिबंधात्मक उपयोजना कराव्यात.
जिल्ह्यातील चार तालुक्यात संक्रमण नसल्याचे आढळून आले. सदर सर्वेक्षणात दहा तालुक्यात दहा तालुके यशस्वी ठरल्याने सार्वत्रिक औषधोपचार मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही औषध रिकाम्या पोटी घेऊन ती चावून खावी, तसेच सक्षम आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समोर खाणे आवश्यक आहे. दोन वर्षापेक्षा कमी वयाचे बालके व गरोदर माता तसेच आजारी बेडवर असणाऱ्या रुग्णांना दिले जाणार नाही. यासाठी जिल्ह्यातील 1422 मनुष्यबळ लावण्यात आले आहे. तर 433 पर्यवेक्षकांना जबाबदारी देण्यात आली आहे.
गोळ्या सेवन केल्यानंतर ताप येणे, मळमळ होणे, उलटी होणे, डोकेदुखी ,अंगदुखी यासारखे सौम्य दुष्परिणाम आढळून आल्यास तात्काळ उपचार करण्याकरिता आरोग्य संस्थेत शीघ्र प्रतिसाद टीम तयार करण्यात आली आहे.
नवीन सर्वेनुसार हत्तीरोग रुग्ण नविन पिढीला 25% ची लागण होत असल्याची बाब समोर आली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. यासाठी जनतेने या मोहिमेला सहकार्य करण्याचेहआव्हान जिल्हा परिषदच्या माध्यमातून करण्यात आले आहे.