आदिवासींना मेल्याशिवाय न्याय मिळणार नाही काय ? ------ अशोक तुमराम
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
नवभारत कन्या विद्यालय, मुल येथे श्री. मुनिम सिडाम हे शिपाई म्हणुन कार्यरत होते. अतिशय दुर्धर आजारामुळे सिडाम यांचे २०१७ मध्ये निधन झाले. कायद्यानुसार श्री. मुनिम सिडाम यांच्या मुलाला अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घ्यायला हवे होते. परंतू आज सहा सात वर्षांपासुन शाळेच्या व्यवस्थापन समितीला विनंती करुन सुध्दा सदर कुटूंबाला न्याय मिळत नाही- घरातील कर्ता पुरुष निघुन गेल्याने कुटूंबावर हलाखीची परिस्थिती आली आहे. यासाठी श्रीमती हर्षकला मुनिम सिडाम यांनी दि. १ मे २०२३ पासुन नवभारत कन्या विद्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरु केले आहे. याकडे शासन, प्रशासन व शालेय प्रशासनाने डोळेझाक केली आहे. त्यांच्या उपोषणाची दखल आज पाचव्या दिवशीही घेतली गेली नाही.
त्यांच्या समस्येकडे जर लक्ष दिल्या गेले नाही व त्यांच्या मुलाला अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेतल्या गेले नाही तर येत्या काळात आदिवासी समाजा तर्फे मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा आदिजन चेतनेचा जागरचे अध्यक्ष अशोक तुमराम यांनी दिला आहे.