वरोरा येथे युवकाची हत्या , हत्येचे ' हे' कारण आले समोर..!


वरोरा येथे युवकाची हत्या , हत्येचे ' हे' कारण आले समोर..!Craim chandrapur

आरोपीला नागपूर येथून घेतले ताब्यात!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (वरोरा)
वरोरा येथे एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हत्या झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी शहरात पसरतात परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले . परिसरात शांतता असून, पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असून आरोपीला नागपूर रेल्वे स्टेशन वरून अटक करण्यात आली आहे. संबंधित खून प्रकार हा प्रेम प्रकरणातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एकाच मुलीच्या प्रेमात अडकलेल्या या वादातून दोन मजनूचा वाद विकोपाला गेला त्यातूनच एकाचा खून झाल्याचे बाप समोर आली आहे. रितेश लोहकरे हा
वरोरा येथे असलेल्या फुकट नगर परिसरात शिक्षणाकरिता राहत होता. घरापासून काही अंतरावर
ह्या तरुणाचा खून झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले , त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली असून,
आज शनिवारी पहाटे तेथून जाणाऱ्या नागरिकांना त्याचा मृत्यू देह आढळून आला .,त्याची माहिती वरोरा पोलिसांना दिली,माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले,पोलीस तपासात यंत्रणेची चक्र फिरवले, पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवा
- रितेश लोहकरे नावाच्या तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरापासून हाकेच्या अंतरावर आढळून आला असून, रितेशला काठीने बेदम मारहाण करण्यात आली आहे,
रितेशची हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याची विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाली.
सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो राहत असलेल्या घराच्या हाकेपासून काही अंतरावरच त्याचा खून होतो परंतु परिसरात याची कुठलीही कुणकुण न होणे.,
, यापेक्षा आश्‍चर्यकारक काहीही असू शकत नाही, परंतु वरोरा पोलिसांनी या प्रकरणाचे गुपित  उगळून काढले असून आरोपीला नागपूर रेल्वे स्टेशन वरून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.