सीडीसीबँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार
मुल शहर बंदचे आवाहन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (मुल)
मूल येथील काँग्रेसचे नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत (Santosh Ravat) यांच्यावर आज अज्ञात इस्मानी गोळी झाडली. या घटनेत संतोष रावत यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नसली तरी त्यांच्या हाताला घासून गोळी गेली.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष राऊत यांच्यावरील आज झालेल्या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज पुढे आला आहे. यामुळे आरोपीपर्यंत जाण्यासाठी पोलिसांना निश्चित मदत होणार आहे.
याप्रकरणी मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असून, संतोष रावत यांना मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करिता नेण्यात आले.
आज सायंकाळच्या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूल शाखेच्या परिसरात ही घटना घडली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत हे मूल येथील शाखेत आपल्या कार्यकर्त्यासह बसुन होते, दरम्यान रात्रौ 9.30 वाजता घराकडे जाण्यासाठी निघाले असता, एका स्विप्ट कार मधु बुरखाधारी इसमाने त्यांच्यावर गोळीबार केले, यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी कार पकडण्याचा प्रयत्न केला मात्र कार घेवुन पळुन जाण्यास ते यशस्वी झाले. श्री. रावत यांच्यावर गोळीबार करण्यामागचे नेमके कारण अजुन तर गुलदस्तात आहे. सदर घटनेने राजकीय वर्तळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
आज सर्वीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत होणार आहेत.
तद्वतच या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात बंद पुकारले गेले आहे. पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत असल्याची सूत्राकडून माहिती मिळाली आहे. लवकरात लवकर गोळी बार करने वाल्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी मूलशहर बंद चे आव्हान केले आहे.