तहसील कार्यालयातील दलालांचा 'कोंबडा' हातातून गेला!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर तहसील कार्यालयात मार्फत अर्ज केल्या तारखेपासून केवळ एकाच दिवसांमध्ये दाखले निर्गमित करण्यात येणार आहे. असे नायब तहसीलदार गादेवार यांनी प्रसार माध्यमांना काही दिवसांपूर्वीच दिलेल्या माहितीत सांगितले. चंद्रपूर तालुक्यातील चंद्रपूर शहरासह 102 गावात मिळून अंदाजे सात लाख लोकसंख्या असून दाखल्यासाठी रोज सुमारे तहसील कार्यालयात 500 अर्ज दाखल होतात. या सर्वांचे काम त्वरित होणार अशी माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.
यामुळे प्रमाणपत्र, दाखले मिळवण्यासाठी आजूबाजूला बसलेल्या दलांलाची वसीलीबाजी, तहसील कार्यालयात खुरखुडी चालायची मात्र नायब तहसीलदार गादेवार यांनी काही दिवसापूर्वी तहसील कार्यालयातून एकाच दिवसात कागदपत्र मिळणार असल्याचे जाहीर केल्याने तहसील कार्यालयातील भरकटलेल्या दलालांचा 'कोंबडा' हातातून गेला अशी चर्चा तहसील कार्यालयाच्या परिसरात सुरू आहे.
कार्यालयात एक दिवसात सर्व कागदपत्रे मिळणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, आज पर्यंत एकाही अर्जदाराला एका दिवसात दाखले ,प्रमाणपत्रे मिळत नसल्याची नागरिकात चर्चा सुरू आहे.
अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, महिला आरक्षण प्रमाणपत्र, अशा विविध प्रकारचे दाखले निर्गमित करण्यासाठी सेवा हमी कायद्यानुसार 15 ते 21 दिवसाच्या कालावधी शासनाकडून विहित करण्यात आला आहे. परंतु चंद्रपूर तहसील कार्यालयामार्फत अर्ज केल्या पासून केवळ एकाच दिवसात दाखले मिळण्याची नायब तहसीलदार गादेवार यांनी मिळणार असे सांगितले होते. त्यामुळे या परिसरातील वसीला किंवा दलालांली करणाऱ्यांचे कोंबडाच हातातून गेल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगत आहे.