पर्यावरण संवर्धन व विकास समितीकडून डेबू सावली वृद्धाश्रमात निसर्ग एकवनकरच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळ वाटप




पर्यावरण संवर्धन व विकास समितीकडून डेबू सावली वृद्धाश्रमात निसर्ग एकवनकरच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळ वाटप

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दि.10 ऑगस्ट 2023 ला पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या वतीने देवाडा येथिल जि. पं. शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर डेबू सावली वृद्धाश्रमात वृक्षारोपण व निसर्ग एकवणकर याचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला .
श्री संत गाडगेबाबा, श्री डेबुजी सावली वृद्धाश्रमात देवळा येथे निसर्ग दिनेश एकवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धन व विकास समिती यांच्यावतीने वृक्षारोपणाचे कार्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वृद्धाश्रमात असलेल्या वृद्धांना फळ बिस्किटाचे वाटप करण्यात आले. गाडगेबाबा यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून येथील आजी आजोबांनी निसर्गाच्या वाढदिवसानिमित्त भरभरून आशीर्वाद दिले. याच निमित्ताने डेबू सावली येथील वृद्धाश्रमात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी या वृद्धाश्रमात   सदस्या  निशा धोंगडे  यांनी या वृद्धाश्रमाची  हित भूत माहिती पर्यावरण समितीच्या सदस्यांना सांगितली.शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धन व विकास समितीकडून आंब्याांचे वृक्ष देवु शुभेच्छा दिल्या. तर आ. सुधाकर अडबाले यांनी निसर्ग याला वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

 या वृद्धाश्रमात असलेल्या महिला शिक्षिका  सुदा मुडे यांनी
निसर्ग यांना वाढदिवसाच्या  प्रित्यर्थ  सुंदर अशी एक कविता सादर केली. शुभ आशीर्वादसह ,हार्दिक शुभेच्छा दिल्या .
त्यावेळी डी. के. आरीकर, प्रा. रमेशचंद्र दहिवडे, जामदार साहेब, राजेश पिंजरकर, अमृतलाल राठी, निशा धोंगडे, स्वाती दुर्गमवार, वंदना कातकर, कविता तिजारे, दिनेश एकवणकर, भेलके आणि डेबू सावली वृद्धाश्रमातील वृद्द नागरिक उपस्थित होते.