प्रशासनाने राष्ट्रध्वजाबाबत नियमावलीत राहून विक्री व वाटप करावे- अविनाश आंबेकर
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर त्यांच्याद्वारे मनपा कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, घरो घरी तिरंगा, ध्वज संहिता, 'मेरी माटी मेरा देश' राष्ट्रध्वज हे राष्ट्रीय चिन्ह आहे आणि प्रत्येक भारतीयांना त्याचा आदर आहे. राष्ट्रध्वजाबाबत काय करावे व काय करू नये याची नियमावली शासनाने ठरविली आहे. परंतु मनपा कार्यालयात राष्ट्रध्वज विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आला आहे.ते राष्ट्रध्वज एका महिला बचत गटा माध्यमातून विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.
ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा आकार आयताकार हवा, लांबी आणि रुंदीचे प्रमाण 3:2 असे असावे. असे स्पष्ट असताना इथे विक्रीस ठरलेले राष्ट्रध्वज कुठल्याही आकारात नसून त्यांची लांबी रुंदी सुद्धा नियमानुसार नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश आंबेकर यांच्या लक्षात आले. त्यांनी मनपा प्रशासनातील उपायुक्त मंगेश खवले यांच्या निदर्शनास आणून दिले असता. त्यांनी संबंधित राष्ट्रध्वज हे हजारोच्या संख्येने आल्याने त्यात कमी-जास्त असू शकते. तसे काही असल्यास त्याची पाहणी करून आम्ही ते विक्री व वाटल्या जातील असे सांगितले.
तिरंगा बनवण्यासाठी खादी, रेशीम, नायलॉन, पॉलिस्टर, लोकर, सिल्कसह, मशीन मध्ये तयार करण्यात आलेल्या कापडाचा राष्ट्रध्वजाला मान्यता आहे. असे असले तरी, नायलॉन सारख्या कपड्याला राष्ट्रध्वजासाठी मान्यता आहे का? असा प्रश्न अविनाश आंबेकर यांनी केला. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रध्वज खादीचा असायला पाहिजे, राष्ट्रध्वज नायलॉनचा नसावा, इथे मनपाकडून बचत गटाला विक्रीसाठी ठेवलेले तिरंगा त्वरित विक्री बंद करावी , आणि नियमानुसार राष्ट्रध्वजाची विक्री करावी.
संबंधित राष्ट्रध्वज विक्री करताना, किंवा वाटताना त्याचे निर्बंधात राहुन नागरिकांना द्यावे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो स्वातंत्र्यवीरानी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या बलिदानाचे आपण ऋणी आहोत. आम्हा सर्वांना स्वार्थ अभिमान आहे. म्हणून देशाच्या तिरंगाचा कुठलाही अवमान होणार नाही. याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे. खास करून ज्या कंपनीला तिरंगा बनवायचा कंत्राट दिला, त्यांनी देशाच्या हिताचा विचार करूनच झेंड्यामध्ये सर्वात वर केसरी मध्यभागी पांढरा व खाली हिरवा असा तिरंगा बनविला असावा. मध्यभागी पांढऱ्या पट्टीवर 24 रेषाचे गोलाकार निळ्या रंगाचे अशोक चक्र असावे. अशा सर्व सूचना प्रशासनाकडून असून निरीक्षण करूनच वितरण करण्यात याव्या. तिरंगा हा ठरलेल्या आकारानुसारच असावा.
आणि योग्य राष्ट्रध्वजाचा नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यावा त्याचप्रमाणे ध्वज संहितेची अवमानना होणार नाही याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.