Pomburana पोंभुर्णातील 'ईको पार्क' बनले मजनुसाठी अय्यासीचा अड्डा ! वन विभागाचे दुर्लक्ष!
 'इको पार्क' खंडाळ बनण्याच्या मार्गावर!
दिनचर्या न्युज :- 
चंद्रपूर :- 
चंद्रपूर जिल्ह्यातील  पोम्भुर्णा तालुक्यात  सन 2016- 17 मध्ये   विकासाभिमुख, लोकनेते, विकास पुरुष,  राज्याचे वनमंत्री ना.  सुधीर मुनगंटीवार  सदैव विकासाचा ध्यास घेतलेले प्रेरणादायी नेतृत्व यांनी आपल्या संकल्पनेतून विकास व्हावा या दृष्टिकोनातून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी 'इको पार्क'  पोंभुर्णात  जवळपास पाच करोड लागत लागलेले   अतिशय देखणे, लोभनीय, सर्वांना आकर्षित करणारे ' इकोपार्क' बनवले होते.
मध्य चांदा वन विभागाच्या अधिनस्त असलेल्या इको पार्क मध्ये प्रवेशासाठी तिकीट लावण्यात आली होती. काही वर्ष आकर्षक असणारे इको पार्क मात्र आता मजननू साठी अय्यासीचा अड्डा बनला आहे. संपूर्ण  इको पार्क ची दयनीय अवस्था झाली असून या पार्क कडे वन विभागाने लापरवाही, निष्क्रियता या दुर्लक्षितपणामुळे  संपूर्ण इको पार्क ची खंडाळ  अवस्था झाली आहे.
 संबंधित वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला फोनवरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता. कुठलाही प्रतिसाद दिला नाही. या पार्कमधील सर्व वस्तू   जीर्ण अवस्थेत असून  मुलांचे खेळणे, प्राण्याचे लावलेले पुतळे, सर्व खंडाळ झालेल्या अवस्थेत आहे. या पार्कला मागील बाजूने कंपाउंड करण्यात आले होते ते कंपाउंड तुटल्यामुळे या परिसरात वावरणाऱ्या हिस्त्र पशु चे पार्क मध्ये  आगमन होऊ शकते. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना या हिस्त्र वन प्राण्याचा मानवी जीवाला धोका होऊ शकतो. या संपूर्ण बाबीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जातीने लक्ष द्यावे, करोडो लागत लागवलेल्या इको पार्कला संजीवनी द्यावे, नाहीतर या इको पार्कच्या मागण्यासाठी संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी आंदोलन करण्याचे आव्हान केले आहे.
