चंद्रपूर येथे संत सेनाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव संपन्न




चंद्रपूर येथे संत सेनाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव संपन्न

संत सेना महाराज आपल्याला कार्यावर निष्ठा व श्रद्धेची शिकवण देतात- हरीश ससनकर

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर- दिनांक 11 सप्टेंबर रोजी राष्ट्रसंत, संतश्रेष्ठ संत सेनाजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सोहळा संत नगाजी महाराज मंदिर सभागृह समाधी वार्ड चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.रमेशराव हनुमंते जिल्हाध्यक्ष नाभिक महामंडळ हे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून हरीश ससनकर शिवरक्षक जिवाजी महाला पुस्तकाचे लेखक हे आणि प्रमुख उपस्थितीत विधिज्ञ ऍड.विनोद बोरसे, श्रीकांत सहारे अध्यक्ष सर्व सेवा शिक्षण मंडळ, प्रकाश चांदेकर, सरोजताई चांदेकर कीर्तन व प्रबोधनकार, शामदेवजी उरकुडे, वैष्णवी विश्वंभर मांडवकर तसेच कार्यक्रमाचे आयोजन मधुकर क्षीरसागर हे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक हरीश ससनकर यांनी संत सेनाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत त्यांचे विचार व संदेश आजच्या काळातही कसे जीवनोपयोगी आहे, चिरकाळ टिकणारे व आपल्या कार्यावर निष्ठा आणि श्रद्धा कशी ठेवावी याची शिकवण देणारे आहेत. प्रत्येकाने आपल्या घरी एक छोटे वाचनालय निर्माण करावे, इतर व्यसनांचा त्याग करून वाचनाचे व्यसन लावावे असे श्रोत्यांना आवाहन केले, आपल्या मुलांनी खूप पैसे कमावण्यापेक्षा चांगले सुसंस्कृत नागरिक बनणे गरजेचे आहे त्यासाठी उपयुक्त संस्कार पालकांनी त्यांच्यावर करावे असे मत व्यक्त केले. यावेळी ऍड.विनोद बोरसे व श्रीकांत सहारे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.
ह.भ.प.सरोजताई चांदेकर यांनी संत सेना महाराजांच्या जीवनकार्यावर कीर्तन सादर केले. कार्यक्रमात 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शामदेवजी उरकुडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला, संगीत क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या गोंडवाना विद्यापीठातील सुवर्ण पदक विजेती कु. वैष्णवी विश्वंभर मांडवकर हिचा, कुस्ती या खेळात कुमार गटात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या भावेश राजेश बन्सोड याचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रकाश चांदेकर व सरोजताई चांदेकर या उत्साही समाजशील जोडप्याचा सुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा शेवट काला व महाप्रसादाने करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन गिरीश कडुकर सर यांनी तर प्रास्ताविक राजेंद्र बन्सोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज संघटनेचे पदाधिकारी मधुकर भाऊ क्षीरसागर, अरुणराव चौधरी, राजेंद्र बन्सोड, भाऊराव येसेकर, विलास वनकर, रुपेश लाखे, मोरेश्वर नागतुरे, श्यामराव वनस्कर, रामकृष्ण कीर्तने, विश्वंभर मांडवकर, गोपाल वाटकर, गजानन अनकर, श्याम इंगळे, प्रदीप नक्षीने, अमित गालोरीया यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शहरातील बहुसंख्य नाभिक बांधव उपस्थित होते.