पत्रकारांना मंत्र्यांनी बोलवले, वन विभागाने अडवले!




पत्रकारांना मंत्र्यांनी बोलवले, वन विभागाने अडवले!

पत्रकारांचा कार्यक्रमावर बहिष्कार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- ताडोबा झरी येते दहा जटायू संवर्धन उद्घाटना सोडण्यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना निमंत्रित केले होते. पण झरी गेटवर पोहोचतास वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून पत्रकारांना जाण्यास अडवणूक करण्यात आली. याचा संताप पत्रकारांनी वन विभागाच्या माती मारला . पत्रकारांना मंत्र्यांनी बोलवले, पण वन विभागांनी अडविले!
यात काही पत्रकारांना स्पेशल वहानाची व्यवस्था तर काहिना जनरल व्यवस्था असा दुजाभाव का?
अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत असताना काल चंद्रपुरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. जिल्ह्यात राममय वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने आज राज्याचे वनमंत्री सुधीर मुगनगंटीवार यांच्या संकल्पनेतून रामायणात उल्लेख असलेल्या जटायू अर्थात गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने ताडोबा जंगलातील झरी परिसरात जटायू पक्षांना सोडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन वन विभागाकडून मोठा गाजावाजा करून करण्यात आले होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज ताडोबा जंगलात आठ जेठायू सोडण्यात आले. या कार्यक्रमाचे वृत्तांकन व चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना वनविभागाने अडविले. वनमंत्री यांचे सोबत भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना तसेच पत्रकारांचे एक वाहन सोडण्यात आले परंतु उर्वरित पत्रकारांच्या गाड्या अडविण्यात आल्या, यामुळे पत्रकार संतापले. एक प्रकारे कार्यक्रमात बोलावून पत्रकारांना अपमानित करण्यात आले. गेटवर वन अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी उज्जत सुद्धा घातली. विशेष म्हणजे माहिती व जनसंपर्क विभागाचे जिल्हा माहिती अधिकारी यांना सुद्धा जटायू संवर्धननाचे ठिकाणी जाता आले नाही. वन कर्मचाऱ्यांना उपस्थित अधिकाऱ्यांना विचारले असता रामगावकर यांचे आदेश असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही असे सांगण्यात आले. शेवटी पत्रकारांनी या इव्हेंटवर बहिष्कार टाकला अनेक पत्रकार बातमी न करताच परतले.