आ. जोरगेवारांनी टोचले प्रशासनाचे कान ! जिल्हा कृषी महोत्सव



आ. जोरगेवारांनी टोचले प्रशासनाचे कान ! जिल्हा कृषी महोत्सव

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा कृषी महोत्सव सुरू आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे उद्घाटक म्हणून आले होते. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नामदार सुधीर मुनगंटीवार होते.
शेतकरी बांधवांसाठी प्रथमच उघडणार कृषी विकासाचे नवे दालन .चांदा ऍग्रो 2024 चे कृषी महोत्सव, पशु प्रदर्शनी, चर्चासत्रे आणि विविध बचत गटाचे स्टाल लागले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगात चंद्रपूरचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रोटोकॉल नुसार कार्यक्रमात भाषण नव्हते. वेळेवर जिल्हा प्रशासनाने कृषी महोत्सवात भाषण करण्याची संधी दिली. आणि स्थानिक आमदार प्रशासनावर चांगलेच बरसले.
माझ्या मतदारसंघात होणाऱ्या कार्यक्रमात माझे भाषण असेल तरच मला आमंत्रित करायचे अन्यथा करू नये असे म्हणून स्थानिक जिल्हा प्रशासनाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी कान टोचले. यापुढे अशी चूक प्रशासनाकडून होता कामा नये. मला वेळेवर बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी प्रशासनाची अभिनंदन करतो. मतदार संघात देशातील सर्वाधिक मतदान घेऊन निवडून आलेला आमदार आहे. म्हणून मला निमंत्रण असेलच तरच बोलवा अशी सुख प्रशासनाकडून यापुढे होता कामा नये. असे खडे बोल प्रशासनाला सुनावले. आणि उपस्थित असलेल्या नागरिकाचा टाळ्यांचा आवाज झाला.