हॉटेलमध्ये दारू पिऊ दिले नाही म्हणून मालकावर धारदार शस्त्राने हल्ला
राजुरा लगत असलेल्या पाहुणचार हॉटेल येथिल घटना
दिनचर्या न्युज :-
राजुरा : चूनाळा रोडवर दसवारू नाल्याजवळ असलेल्या पाहुणचार हॉटेल मध्ये (दिनांक २५) रात्री ११ वाजता चार युवकांना हॉटेल मालकाने दारू पिण्यास मज्जाव केल्याने हॉटेल मालक स्वप्नील गजानन मोहुर्ले यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला असून यात हॉटेल मालक जखमी झाले आहे. यातील दोन आरोपींना अटक केली असून दीन आरोपी फरार आहे.
चुनाळा रोडवर दसवारू नाला बामनवाडा येथे शिवसेना (ऊ.बा. ठा.) विद्यार्थी युवा प्रमुख, स्वराज्य फॉउंडेशन चे अध्यक्ष स्वप्नील मोहूर्ले यांच्या मालकीचे पाहुणचार हॉटेल आहे. नेहमी प्रमाणे हॉटेलमध्ये ग्राहक सुरू होते. रात्री ११ वाजता हातात दारूचे बॉटल असलेले चार युवक येऊन फॅमिली रूममध्ये दारू पिण्यासाठी बसले असता, हॉटेल मालक स्वप्नील मोहुर्ले यांनी त्यांना फॉमिलि रूम मध्ये महिला बसून आहे तेव्हा तुम्हाला इथे दारू पिता येणार नाही म्हणुन सांगितले. दारू घेऊन आलेल्या चार युवकांनी हॉटेल मालकांसोबत भांडण केले व शिवीगाळ केली यात स्वप्नील गजानन मोहुर्ले यांना पाठीमागे धारदार शस्त्र मारले यात ते जखमी झाले. यावेळेस त्याठिकाणी उपस्थित त्यांचे सहकारी यांनी राजुरा पोलीस स्टेशनला फोन लाववून घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे उपचारासाठी दाखल केले. हल्ला धारदार चाकूने केल्याने रक्तस्त्राव झाल्यामुळे पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून रितीक भास्कर लांडे (वय २० वर्ष), निरज राजु चिडे (वय २१ वर्ष) दोन्ही जवाहरनगर राजुरा येथिल असून या दोघा आरोपीला अटक केली आहे, तर दोन आरोपी फरार झाले. यांच्यावर अपराध क. १५३/२०२४ कलम ३२६, ३२३, ५०४, ३४ भादवी नुसार गुन्हा नोंद केला आहे.
पुढील तपास राजुरा चे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, गुन्हे शोध पथकाचे प्रभारी उपपोलीस निरीक्षक पांडुरंग हाके, पोलीस हवालदार सुनिल गौरकार, किशोर तुमराम, पोलीस शिपाई तिरूपती जाधव, संदिप बुरडकर, महेश बोलगोडवार, रामा बिगेवार तपास करीत आहे.