पिपरीतील 'त्या' रेती तस्कराच्या गाडीवर पोलिसांची कारवाई?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षक आले तेव्हापासून अनेक अवैद्य धंद्यावर अंकुर लावण्यात येश मिळवले. जे महसूल, खनिकर्म विभागाला जमले नाही ते आता पोलीसांना यश येत आहे.
मात्र काही रेती तस्करांनी आपला रेती तस्करीचा धंदा अजूनही सुरू ठेवला आहे. अशीच माहिती आज सकाळी पहाटेच्या वेळेस वर्धा नदीतून तस्करी होत असलेल्या रेतीची हाफ टर्न द्वारे आयात होत असल्याचे चंद्रपूर पोलिसांना माहिती मिळाली. त्या माहिती प्रमाणे चंद्रपूर पोलिसांनी शिदूर -पिपरी रस्त्यावर ' त्या' रेती तस्कराच्या गाडीला थांबवून त्यात चौकशी केली असता रेती आढळून आली. संबंधित रेतीच्या गाडीवर पोलिसांनी कारवाई केल्याची सूत्राकडून माहिती आहे. परंतु ती गाडी कुठे लागली गेली. या संभ्रमात नागरिकात चर्चा सुरू आहे.
या रेती तस्कराचे राजकीय वरदस्त असून सध्या परिसरात तोऱ्यात वावरणारा हा राजकीय पुढारी रेती तस्करात फोपावत आहे . संबंधित महसूल विभागांनी अनेकदा या रेती तस्करांच्या गाड्यावर थातूरमातूर कारवाई करून सोडून दिल्याची माहिती आहे. या संदर्भाची माहिती घेण्याकरता संबंधित विभागाला फोन द्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. पण या रेती तस्करांच्या गाडीवर सकाळी झालेल्या कारवाईचे काय?