जिल्हा प्रशासनाच्या हत्तीरोगमुक्त औषधोपचार मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करा - विवेक जॉन्सन, सिओ





जिल्हा प्रशासनाच्या हत्तीरोगमुक्त औषधोपचार मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करा - विवेक जॉन्सन, सिओ

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषद उपचार मोहीम( आय डी ए) 2023 केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार टास ॲडिशनल एम एफ सर्वेक्षणात यशस्वी ठरलेल्या तालुक्यात राष्ट्रीय कीटक ज्यांना रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्ती रोग दूर करण्यासाठी ही मोहीम जिल्ह्यात राबवण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सन 2023 च्या सर्वेक्षणानुसार 10426 हत्तीपाय तसेच 2022 अंड वृद्धी रुग्णांची अति संवेदनशील जिल्हा म्हणून नोंद करण्यात आली.
चंद्रपूर जिल्हा हा हत्ती रोगासाठी अति संवेदनशील जिल्हा आहे. जिल्ह्यात हत्तीरोग दूर करण्यासाठी सन 2004 पासून सार्वतीक औषधोपचार मोहीम दरवर्षी राबविण्यात येते. सदर मोहीम फलश्रुती म्हणून जिल्ह्यात नवीन हत्ती रुग्ण संक्रमणाची संख्या कमी होत आहे. हत्तीरोगाच्या संक्रमणाचे संरक्षण करण्यात आले त्यात चिमूर व शिंदेवाई तालुक्यात एम एफ दर हा दहा टक्के पेक्षा जास्त आढळून आल्याने सदर तालुका संक्रमण पडताळणी अयशस्वी ठरली असून उर्वरित सर्व तालुके तपासणीच्या दुसऱ्या टप्प्यात गेले. चिमूर व शिंदेवाई तालुका वगळून प्रत्येक तालुक्यात वीस वर्षावरील नागरिकांनी एफ टी एस किट द्वारे तपासणी करण्यात आली. त्या सर्वेक्षणात भद्रावती, चंद्रपूर ग्रामीण, गोंडपिपरी, पोंभूर्णा, मुल ,सावली, ब्रह्मपुरी व राजुरा तालुक्यात एम एफ दर हा 10 पेक्षा जास्त आढळून आल्यामुळे अयशस्वी ठरलेली असून वरोरा बल्लारपूर जिवती/ कोरपणा नागभीड तालुक्यात यशस्वी ठरली आहे. सदर सर्वेक्षणात जिल्ह्यातील दहा तालुके अयशस्वी ठरल्यामुळे त्यातही ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण असल्याने हा तालुका संवेदनशील असल्याचे सांगितले. यासाठी जिल्हा प्रशासनाने 26 मार्च 2024 पासून प्रथम दिवशी प्रत्येकी एक गावात बुथ याप्रमाणे एकूण 1259 बुथची कारवाई करण्यात येणार आहे दुसऱ्या दिवशी 27 मार्च 2024 पासून घरोघरी भेट देऊन आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, तसेच स्वयंसेवक/ स्वयंसेवीका यांना जबाबदारी देण्यात येणार आहे. तर वैद्यकीय अधिकारी, सी एच ओ, आरोग्य पर्यवेक्षक, व आरोग्य सहाय्यक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी गोळ्या खाऊ घालण्याकरिता 1740 मनुष्यबळ लावण्यात आले आहे. लोकसंख्येतील एक लाख 16 हजार 1404 पात्र  लोकसंख्येस गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे. टीमच्या  परवेक्षणाकरिता 177 पर्यवेक्षकांना जबाबदारी देण्यात आली आहे.
 हत्तीरोग हा चंद्रपूर जिल्ह्यातील गंभीर आरोग्य समस्या आहे. या रोगामुळे शारीरिक विकृती ,अपंगत्व गंभीर परिणाम होतात. व रुग्णास आर्थिक, सामाजिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. करिता सर्व नागरिकांनी औषधोपचार मोहिमेत प्रभावीपणे राबवण्यात येत असलेल्या सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य 
कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी पत्रकार परिषदेतून केले. यावेळेस सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकीशक डॉक्टर चिंचोळकर,...
 यांची उपस्थिती होती.
 हत्तीरोग हा मायक्रोफायरिया  डासापासून संक्रमित होतो. आजाराचे संक्रमण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला दूषित क्युरेक्स डासाच्या डंकामुळे होतो. हे डास गढूळ पाण्यात मायक्रोफायलेरिया  जन्माला घालतात. याची लक्षणे पाच-सात वर्षांनी दिसतात. याची निदान करण्याची वेळ रात्री साडेआठ ते बाराच्या दरमन्यात रक्त नमुना संकलन करून केल्या जाते.
 याची लक्षणे हातावर किंवा पायावर अथवा अंडकोशावर सूज येत नाही तर तोपर्यंत रोगाची अजिबात करपता येत नाही. हत्ती पाय ,हत्ती हात किंवा अंड वृद्धी हा आजार होतो अशा रुग्णांना ताप येणे, हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसून येतात. यासाठी जिल्हा प्रशासनाने हत्तीरोग समूळ नष्ट करण्यासाठी औषधोपचार मोहीम राबवली असून आरोग्य विभागाच्या पथकाकडून नागरिकांना गोळ्या  सेवन करण्यास देण्यात येणार आहे. गोळ्या खाल्ल्यानंतर कुणालाही ताप येणे, मळमळ होणे, उलटी होणे, डोकेदुखी, अंगदुखी यासारखे सौम्य दुष्परिणाम आढळून आले असतात काळ उपचार करण्याकरिता प्रत्येक आरोग्य संस्थेत शिग्र प्रतिसाद स्थापन करण्यात आली आहे.
 आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या गोळ्या हा त्यांच्या समक्षच खावे लागणार आहे. तरच आपण आपल्या कुटुंबाला व समाजाला हत्तीरोग आजारापासून दूर ठेवू शकल.