लालपेठ येथील चोरीतील आरोपीच्या शहर पोलीसांनी आवळल्या मुसक्या
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे दिनांक १९/०५/२०२४ रोजी अप क४४२/२४ क. ४५४,४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल असुन थोडक्यात हकिकत याप्रमाणे की घटना ता. वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी नामे श्री. परशुराम रामया नमीला, वय ५५ वर्ष, धंदा किराणा दुकान, रा. लालपेठ चंद्रपुर हे दिनांक १९/०५/२०२४ रोजी १५/०० वा. दरम्यान महाकाली मंदीरात कॉलरीतील लोकांचा पुजापाठ व जेवनाचा कार्यक्रम असल्याने कुटुंबासह महाकाली मंदिरात गेले होते. महाकाली मंदिरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्रो २१/०० वा. चे सुमारास घरी परत आले असता, तेव्हा त्यांचे घराचे दरवाजाच्या बाजुला असलेली खिडकी तुटलेली दिसली. घरात जाउन पाहणी केली असता, १) रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागीने असा एकुण ६५,००० रू. चा माल कोणीतीरी अज्ञात चोराने चोरून नेले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
नमुद गुन्ह्याचे गांर्भीय बघता मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा., मा. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके पो.स्टे. चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेउन पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथील डी.बी पथक मधील सपोनि मंगेश भोंगाळे, पो.उप.नि. निंभोरकर तसेच डि.बी. कर्मचारी असे पो.स्टे. परिसरात रवाना होवुन गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपीस ताब्यात घेवुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीचे नाव :- दिपक रामराज केवट उर्फ भोई, वय ३२ वर्ष रा. लालपेठ कॉलरी नं.४ चंद्रपुर
अप.क्र. ४४२/२०२४ कलम ४५४,४५७, ३८० भादंवि जप्त माल :-
१) कानातील सोन्याचे वेल २ नग, वजन ६ ग्रॅम, किं. अं. ४२,००० रू.,
२) सोन्याच्या कानातील बि १ जोड वजन ३ ग्रॅम, किं. अं. ५००० रू,
३) सोन्याची चैन वजन ५ ग्रॅम कि.अं. ३०,००० रू.,
४) एक सोन्याची अंगठी १ नग वजन ३ ग्रॅम कि. अं.२१,००० रू. ५) एक चांदीचा कमर पट्टा १ नग वजन अंदाजे ५ तोळे अं. कि. ७,००० रू.
असा एकुण १०५०००/- रू. चा माल जप्त करण्यात आला
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, सपोनि. मंगेश भोंगाडे, पोउपनि. निंभोरकर स. फौ. विलास निकोडे, पो. हवा. महेंद्र बेसरकर, पोहवा. संतोष पंडीत, पोहवा. सचिन बोरकर, पो.हवा. निलेश मुडे, म.पो. हवा. भावना रामटेके, पो.अं. इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद ■ख, रूपेश रणदिवे, रूपेश पराते, मंगेश मालेकर, शाहबाज सैयद यांनी केलेली आहे.