मागील सहा दिवसापासून प्रियांशु बंडु देठे लापता, पोलीसांचे संपर्क करण्याचे आवाहन
मागील सहा दिवसापासून प्रियांशु बंडु देठे लापता, पोलीसांचे संपर्क करण्याचे आवाहन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर, गु.र.नं ५६७/२०२४ कलम १३७(२) भा.न्या.सं. मधील बालक नामे प्रियांशु बंडु देठे वय १४ वर्ष रा.अंचलेश्वर गेट चंद्रपुर इथून मागील पाच दिवसापासून घरी परत आला नाही त्यामुळे त्याची आई
फिर्यादी नामे सौ. विशाखा बंडू देठे वय ३२ वर्ष चंदा गृहीणी जात महार रा.अंचलेश्वर गेट चंद्रपुर यांनी पो.स्टे ला येउन तोंडी तकार दिल्ली की त्याचा मुलगा नामे प्रियांशु बंडु देठे वय १४ वर्ष रा. अचलेश्वर गेट बंदपुर हा दि.२९.०६.२०२४ रोजी दुपारी १२.०० वा. चे सुमारास तिचा मुलगा प्रियांशु हा तिला काही न सांगता घरून निघुन गेला व त्याचा संध्याकाळ पर्यंत वाट बघीतले परंतु प्रियांशु हा परी आला नाही व परत फिर्यादी यांनी दोन ते तीन दिवस वाट बघीतली परंतु प्रियांशु हा घरी परत आला नाही तेव्हा फिर्यादी यांनी त्यांचे नातेवाईकांकडे कडे फोन करून विचारणा केली तसेच मित्र, वार्डात राहणारे ओळखीचे लोकांना विचारपुस केले तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टॉफ मध्ये आज पावेतो शोध घेतला असता तो मिळून आला नाही, नमुद बालकास कोणीतरी फूस लाउन पळवून नेले यावत दिलेल्या तरी वरून पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-: बालकाचे वर्णन
बालक प्रियांशु बंडु देठे वय १४ वर्ष रा.अंचेश्वर गेट, जि. चंद्रपुर,
उंची ४ फुट ५ इंग, बांधा सडपातळ, वर्ण सावळा, केस काळे, दोन्ही ओठावर पांढरे डाग, भाषा- मराठी हिन्दी बोलता येते अंगात हाफ पॅन्ट निळ्‌या रंगाचा (वरमोळा) गोल गळ्याचा हाफ टि-शर्ट, आकाशी रंगाची पायात साधी चायल अशा वर्णनाचा
वरिल वर्णनाचा अपहित बालक, याचा शोध आपले पोलीस स्टेशन मार्फतीने होवुन उपयुक्त माहिती मिळाल्यास खालील
मोबाईल कंमाकावर त्वरीत कळविण्यास विनंती आहे.
श्रीमती. प्रभावती एकुरो, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर मो.नं. ९७६७१०३८२९ श्री. संतोष निंभोरकर, पोलीस उप निरीक्षक, पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर मो.नं. ९५२७३४७४४३