उद्या मुनगंटीवारांच्या उपस्थितीत जोरगेवारांचा भाजप प्रवेश ! उद्या गुरुचा शिष्याला तोफा !



उद्या मुनगंटीवारांच्या उपस्थितीत जोरगेवारांचा भाजप प्रवेश !
... उद्या गुरुचा शिष्याला तोफा !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच सर्व राजकीय पक्षांकडून नेत्यांची उमेदवारी मिळण्यासाठी धावपळ सुरू होती. राज्यातील प्रस्थापित महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख राजकीय प्रमुखांना भेटून तिकीट मिळावी यासाठी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची मनधरणी सुरू होती. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत सर्व पक्षातील राजकीय नेत्यांनी खंबीरपणे विरोध दर्शविल्याने अखेर किशोर जोरगेवार यांना प्रवेश सर्व पक्षाने नाकारताच पुन्हा अपक्ष लढणार? असे जाहीर करतात.
जिल्ह्यातील भाजपच्या एका ज्येष्ठ नेतानी दिल्लीत आपले वजन वापरून स्थानिक नेत्यांचा विरोध असताना सुद्धा
  अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा  भाजपात प्रवेश होण्याचा मूर्त ठरवला.  
स्थानिक पातळीवर किशोर  जोरगेवार यांना भाजपची तिकीट न मिळावी  म्हणून सुधीर मुनगंटीवार  दिल्ली वारी करून आलेत. पक्षश्रेष्ठींना एकनिष्ठ पक्षाशी नसल्याची    कान कुस्नी  झाली.  परंतु चंद्रपुरातील भाजपची एक सीट कमी होईल  त्या सर्व  बाबींचा विचार करून
भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना  मुनगंटीवारांच्या
 विरोधाला शांत करण्यात यश   आले.
चंद्रपूरचे आमदार किशोर  जोरगेवार  यांचा अखेर भाजपात प्रवेश निश्चित झाला असून  पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार उद्या चंद्रपुरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या  उपस्थितीत पक्षप्रवेश  होणार . 
 अखेर विरोधातही भाऊंचा  शिष्याला तोफा  मिळाला अशी चर्चा सध्या चंद्रपूर शहरात होत आहे.
 आमदार किशोर जोरगेवार हे कुठल्याही पक्षात गेले असते तरी. त्या पक्षासाठी जागा पदरात पाडून  घेण्याची नामी संधी होती. ती नामी संधी शरद पवारांनी जोरगेवार यांचा प्रवेश नाकारून चंद्रपुरातील महाविकास आघाडीने एका जगाचे  नुकसानच केले. शरद पवारांनी मनात आणले असते तर   जोरगेवारांना पक्षात प्रवेश देऊन चंद्रपूरची जागा पदरात घेता आली असती.  त्याची खंत राष्ट्रवादी पक्षातील शरद पवार गटांना बसणार .
 एकंदरीत चंद्रपुरातील  राजकीय वातावरण पाहता. किशोर  जोरगेवार  यांना प्रतिस्पर्धी तोड  देणारा  उमेदवारच नसल्याची  चर्चा शहरात आहे. त्यामुळे ही जागा भारतीय जनता पक्षाला बोनस स्वरूपात मिळेल की काय?  अशी परिस्थिती एकंदरी दिसून येत आहे.