चिमूर येथे एक हजार रुपयात मत विकत घेण्याचा भाजपचा डाव हानून पाडला !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चिमूर विधानसभा क्षेत्रात भाजप कार्यकर्त्याकडून मतदारांना लोभवण्यासाठी चक्क लिफाफ्यात हजार रुपयात मत विकत घेण्याचा भाजपचा डाव सावरगाव येथील आकाशने उघड केला. आमच्या हातामध्ये भाजपच्या अरुण नाकाडे व शंकर काळे यासह इतर कार्यकर्त्यांनी नकळत पांढऱ्या रंगाचा लिफापा आमच्या हातात दिला. उघडून पाहिले असता पाचशे रुपयाच्या दोन नोटा होत्या. एकंदरीत आम्हा मतदारांना एक हजार रुपयात विकत घेण्याचा भाजपचा प्रयत्न असून
आज मत विकत घेतील'! उद्या महाराष्ट्राला विकून टाकतील . असे वाटते की आता आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला.
सदन नागरिकांनी आपले कुणालाही मत विकता कामा नये असे सोशल मीडियावर वायरल व्हिडिओत आकाश विजय गोस्वामी यांनी भाजप कार्यकर्त्याचा डाव हाणून पाडला. अशा प्रकारचे मत विकत घेण्याचे प्रकार चिमूर विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात होत असेल असे नाकारता येत नाही. त्यामुळे सदन नागरिकांनी आपले व आपल्याला कोणी विकत घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर निवडणूक आयोगाने अशा उमेदवारावर आचारसंहितेचा भंग व मतदारांना आर्थिक मदत करून लोबवण्यास प्रयत्न करण्या कारणावरून त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची मागणी मतदारांनी केली आहे.