नागभीड येथे ' रंगारंग २०२५ ' उत्साहात साजरा स्व. प्रसाद स्मृती चॅरीटेबल ट्रस्ट चे आयोजन




नागभीड येथे ' रंगारंग २०२५ ' उत्साहात साजरा

स्व. प्रसाद स्मृती चॅरीटेबल ट्रस्ट चे आयोजन


दिनचर्या न्युज :-
नागभीड:
मित्र प्रसाद राऊत यांच्या मृत्युनंतर त्याच्या मित्रांनी एकत्र येत स्व.प्रसाद स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना केली व ट्रस्ट च्या माध्यमातून गेल्या १५ वर्षाापासून दरवर्षी २६ जानेवारी ला प्रजासत्ताक दिनी स्थानिक जनता विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यात नागभीड व परीसरातील कॅान्व्हेंट , प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय तथा वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची चमू भाग घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत असतात. याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. यावर्षी सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने या वर्षी या कार्यक्रमाची थीम ' अभिजात मराठी भाषा ' ही होती. दरवर्षी वेगवेगळ्या थीम वर आधारित या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते हे विशेष असल्याने प्रत्येक कार्यक्रम पाहण्याची नागभीडकरांना उत्सुकता असते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ.अमीर धमानी सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. मोहनजी जगनाडे सर, प्रा. डॉ. रेखा जगनाडे मॅडम, भारत सरकारचे नेटकी ॲड.रविंद्रजी चौधरी, रंगारंग चे संयोजक तथा माजी जि.प.सदस्य संजय गजपूरे, प्राचार्य देविदासजी चिलबुले , नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, प्राचार्य दिवाकर ठाकरे सर, प्राचार्य डॉ. मेरी टॉम मॅडम, प्राचार्य तरारे मॅडम, उपप्राचार्य चुटे सर, वीणाताई नागमोती, उपनिरीक्षक पोटभरे सर, यांची उपस्थिती होती. सुरुवातीला स्व.प्रसाद राऊत यांच्या कुटुंबियांना भेटवस्तू देण्यात आले. 
          सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक संजय गजपुरे यांनी केले व रंगारंग च्या आयोजनामागील पार्श्वभुमी सांगत नागभीडकरांय्या सहकार्यानेच हा कार्यक्रम यशस्वी होत असल्याचे विशेषत्वाने नमूद केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.अमीर धमानी सर, प्राचार्य डॉ.मेरी टॉम, प्राचार्य देविदास चिलबुले यांनी आपल्या मनोगतातून  विद्यार्थ्यांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील नवघडे यांनी केले तर आभार गणेश तर्वेकर यांनी मानले. यावेळी सहभागी सर्व शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचलन सतिश मेश्राम , पराग भानारकर व स्वप्निल नवघडे यांनी संयुक्तपणे करीत प्रत्येक सादरीकरणाची माहिती दिली. 
                   सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी स्व.प्रसाद स्मृती चॅरीटेबल ट्रस्ट चे संयोजक अमित देशमुख,पवन नागरे, ओमप्रकाश मेश्राम, प्रवीण बंडावार,सतीश मेश्राम,पंकज गरफडे,स्वप्नील नवघडे,पराग भानारकर,अमोल वानखेडे , गुलाब राऊत,तुषार गजभे,प्रशांत  भुरे , क्षितिज गरमडे,जितू वानखेडे, समिर भोयर , विवेक गोहने, प्रीतम रगडे,प्रशांत भुरे,सतीश जिवतोडे, रोमी कटारे, प्रफुल भोयर,सूरज शास्त्रकर, विक्रांत गजपुरे,प्रणय दरवरे, नाविन्य बंडावार, कलश अमृतकर, स्नेहल चिलबुले, अविनाश मदनकर, प्रशांत राहुड,रिदम शेंडे यांनी प्रयत्न केले.