जिल्हा चित्रीकरण झालेल्या सचिन पिळगावकर प्रस्तुत 'स्थळ 'या चित्रपटाचा सात मार्चला शुभारंभ !sachin pirgaonkar presents
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात असलेल्या डोंगरगाव येथील गावात चित्रीकरण झालेल्या सचिन पिळगावकर प्रस्तुत sachin pirgaonkar presents "स्थळ'' या चित्रपटाचे 7 मार्चला महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.
सचिन म्हणाले, मी आत्तापर्यंत बनवलेल्या चित्रपटापैकी, अनेक स्टोऱ्या कथा, चित्रपट प्रदर्शित केल्या पण या चित्रपटातील 'स्थळ 'या नावातच स्टोरी, चित्रपट पाहिल्यानंतर काहीतरी वेगळे असल्याचे जाणवले. आणि मी ते या चित्रपटासाठी प्रस्तुत करण्यासाठी पुढाकार घेतला. या चित्रपटासाठी जिल्ह्यातीलच कलाकार असून डोंगरगाव गावातील नागरिकांनी स्वतः सहकार्य केले.
या चित्रपटाचे 22 दिवस चित्रकरण करण्यात आले.
काम करणारे कलाकार हे कधीही न काम करणारे होते. परंतु नवीन चेहरे असताना सुद्धा स्थानिक लोकांना यात काम दिले गेले. पण आपल्या भागातील कलाकारांचे टॅलेंट खूप चांगले आहेत. त्यांना सूक्त गुणाची वाव मिळणे गरजेचे आहे. ते या चित्रपटातून आपणास पाहावयास मिळणार आहे.
पूर्व विदर्भात नागपूर नंतर चंद्रपुरातच पत्रकार परिषद घेण्यात येत असल्याने यानंतर कुठेही पत्रकार परिषद होत नसल्याची सांगितले.
या मागचे एकच कारण आहे की प्रसार माध्यमाच्या माध्यमातून या भागातील लोकांपर्यंत स्थळ या चित्रपटाची माहिती पोहोचावी या मागचा उद्देश आहे. कारण या चित्रपटाचे चित्रीकरणच स्थानिक जिल्ह्यात करण्यात आले असून यातील सर्व कलाकार ग्रामीण भागातली आहेत. आपण आवर्जून सात तारखेला प्रदर्शित होत असलेल्या चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहावे .
पूर्वी ग्रामीण भागात विवाह स्थळासाठी, ज्या बैठका व्हायच्या. बैठकीत मुलींना विवाह संबंधित विचारपूस व्हायची, इच्छा नसताना सुद्धा, त्या मुलीविरोधात त्या बैठकीत मुलिंच्या विवाहाची तडजोड केली जात असे आणि मग त्यातून काय परिणाम होत असत असे या चित्र 'स्थळ' या चित्रपटात दर्शवण्यात आले आहेत. आपण नक्कीच या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा चे आव्हान चित्रपट प्रस्तुत सचिन पिळगावकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेतून केले आहेत.