26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पणउमेश तिवारी/कारंजा(घाडगे)
 कारंजा (घा ) -महाराष्ट्राची राजधानी मुंबई  शहरावर आज पासून 10 वर्षांपूर्वी घडलेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यातील वीर शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली  . स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेप्रति आपले कर्तव्य बजावत जवानांनी आपले प्राण गमावले होते. संपूर्ण देश 26/11 चा हल्ला विसरू शकणार नाही व येणाऱ्या दशकात विसर पडणार नाही ,असा घाव संपूर्ण देशातील नागरिकांच्या हृदयात पडला आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
 कारंजा शहरातील मित्र परिवाराच्या वतीने नगरपंचायत कॉम्प्लेक्स परिसरात शहिदांना श्रद्धांजली सभेच आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला 26/11 च्या हल्ल्यातील घडलेल्या घटनांची रीतसर माहिती देत जवानांच्या स्मृती उजाळा देण्यात आला. त्यानंतर उपस्तीत मान्यवर , व्यापारी , नागरिक व विद्याथ्यानच्या वतीने कँडल लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . मौन श्रद्धांजली अर्पण करून मा .सुभाष अंधारे सर ,पोलीस उप-निरीक्षक मा. केंद्रे साहेब ,मा. विलास वानखडे सर व मा .प्रेम महिल्ले सर यांनी हल्ल्यातील घटनेची माहिती देत शाब्दिक श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली कार्येक्रमाला कारंजा शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्तीत होते कार्येक्रमाचे सूत्रसंचालन मा पवन ठाकरे सर यांनी केले तर कार्येक्रमच्या यशस्वीते करिता  स्थानिक मित्रपरिवारने सहकार्य केले .