१७ मीटर उंचीवर होणार स्पॅनचे निर्माण कार्य


राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूना वायाडक्ट द्वारे जोडले जाणार



नागपूर १६ : (रिच-१) एयरपोर्ट साउथ मेट्रो स्टेशन ते सिताबर्डी पर्यंतच्या वायाडक्टचे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केल्या नंतर महा मेट्रो द्वारे झाशी राणी चौक येथे शहीद गोवारी उड्डाणपूलाच्या वरून वायाडक्टच्या निर्माण कार्यास सज्ज झाले आहेत. दिनांक १७ डिसेंबर २०१८ (सोमवार) पासून याठिकाणी गर्डर लॉन्चिंगच्या कार्याला सुरुवात करण्यात येणार आहे. नुकतेच महा मेट्रो द्वारे (रिच-१)एयरपोर्ट साउथ ते सिताबर्डी पर्यंत शेवटचे गर्डर लॉन्चिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले,तसेच (रिच-३)लोकमान्य नगर ते मुंजे चौक येथील क्रेझी कॅस्टल येथे शेवटचे फाउंडेशनचे कार्य देखील संपन्न झाले. या दोन्ही मार्गिकेवरील कार्य पूर्ण केल्यानंतर महा मेट्रोने आणखी एका आव्हानत्मक कार्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.


गर्डर लॉन्चिंगचे कार्य पियर क्र. २९२ ते २९३ दरम्यान करण्यात येणार असून गर्डर लॉन्चिंग गोवारी उड्डाणपूलाच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूने स्पॅनद्वारे सेग्मेंट पद्धतीने पूर्ण केल्या जाईल. राज्यात मेट्रो प्रकल्पाशी सबंधित अश्या प्रकारचे निर्माण कार्य पहिल्यांदाच नागपूर मेट्रो येथे करण्यात येत आहे,हा संपूर्ण स्पॅन ३६ मीटरचा असून हे कार्य (रिच-३) येथील महा मेट्रोचे अधिकारी, कंत्राटदार मेसर्स. अफकॉन्स आणि जनरल कंसलटंट यांच्याद्वारे पूर्ण केल्या जाईल.


झाशी राणी चौक येथील मेट्रो निर्माण कार्य राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूना वायाडक्ट द्वारे जोडेल. दीड दशक जुन्या या उड्डाणपूलाची उंची जमीनीपासून उंची १०.१८९ मीटर एवढी असून वायाडक्टचे निर्माण झाल्यानंतर जमीनीपासून उंची जास्तीत जास्ती १७.०६३ मीटर इतकी राहील व वायाडक्ट आणि उड्डाणपूलाचे अंतर ७.४१४ मीटर एवढे राहील. उड्डाणपूलाच्या दोन्ही बाजूच्या पियर वर्कचे कार्य अंदाजे १७ मीटर पर्यंत आधीच पूर्ण झाले आहे. लोकमान्य नगर ते मुंजे चौक पर्यंतचा मेट्रो मार्ग झाशी राणी चौक येथील शहीद गोवारी उड्डाणपूलाला क्रॉस करून मुंजे चौकातील सिताबर्डी इंटरचेंजला जोडेल. या ठिकाणी सद्यस्थितीत २स्तरीय वाहतूक सुरू असून मेट्रोचे कार्य पूर्ण झाल्यास ३ स्तरीय वाहतूक व्यवस्था निर्माण होईल.


३६ मीटर स्पॅन असलेल्या उड्डाणपूलाच्या वरचे कार्य हायब्रिड इंरेव्कशन पध्द्तीने (Hybrid Erection Scheme’) ग्राउंड सपोर्ट सिस्टम (Ground Support System) आणि ओवरहेड लॉन्चिंग गर्डरच्या साह्याने पूर्ण केल्या जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया एका सेग्मेंट नंतर दुसऱ्या सेग्मेंटला उचलून उच्च क्षमतेच्या टायर-माउंट केलेल्या हायड्रोलिक क्रेनच्या मदतीने पूर्ण केल्या जाईल आणि एका ठिकाणी एकत्रित करून जोडल्या जाईल. हे संपूर्ण कार्य विशेषतः रात्री आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून ट्राफिक पोलीस यांच्या देखरेखीत पूर्ण केल्या जाईल. याशिवाय महा मेट्रो, नागपूर द्वारे कार्यस्थळी जलद कृती पथक (QRT) ची नेमणूक कार्य पूर्ण होई पर्यत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत पूर्ण करण्यात येईल.