वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'ला सोन्याची झळाळी

चंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला
प्रतिष्ठीत स्कॉच अवार्डचे सुवर्णपदक



चंद्रपूर दि. २३ डिसेंबर : चंद्रपूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या व कौशल्य विकासाचे केंद्र बनलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला यंदाचा प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्काराच्या सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले आहे.
                राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थ, नियोजन व वन खात्याची जवाबदारी मिळाल्यानंतर बांबू धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे जागतिक दर्जाच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचा निर्धार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला होता. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्याच बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. देशातील ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या उपस्थितीत बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे भूमिपूजन झाले. बघता बघता हा पप्रकल्प चंद्रपूर-गडचिरोली व आजूबाजूच्या परिसरातील कौशल्य विकासाचे प्रमुख केंद्र झाले आहे. या केंद्रामुळे देशाच्या ईशान्य कडील बांबू उत्पादक प्रदेशाशी चंद्रपूरचे व्यावसायिक नाते जोडले गेले आहे. तर याठिकाणावरुन चीन, जपान व अन्य बांबू उत्पादक देशांसोबतही वैचारिक व प्रशिक्षणाची भागीदारी होत आहे.

          या केंद्राच्या मार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत १ हजार महिलांना बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत. यामुळे बांबू पासून वेगवेगळ्या वस्तु तयार करण्याच्या उद्योगाला चालना मिळाली आहे. याशिवाय बांबूपासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी विक्री केंद्र उभारली जात आहे.अमेझॉन व अन्य प्रतिष्ठीत अशा वस्तू विक्री संस्थांची या केंद्राचा संपर्क आला आहे. बांबू हँडीक्राफ्ट अँड आर्ट युनिट हा उपक्रम या प्रक्रियेत मैलाचा दगड ठरला आहे . सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे , चंद्रपूर , विसापूर ,पोंभुरणा , संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती , महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या  ठिकाणी कार्यरतबांबू हँडीक्राफ्ट अँड आर्ट युनिटच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. चिचपल्ली , मुल आणि चिमूर याठिकाणी हे युनिट लवकरच कार्यरत होणार आहे.

      या ठिकाणी तयार झालेला तिरंगा ध्वज हा देशाचे राष्ट्रपती , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात फडकला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरापर्यंत या ठिकाणच्या वस्तू पोहोचल्या आहेत. या केंद्रातून वेगवेगळ्या पद्धतीच्या अभ्यासक्रमांनाही सुरुवात झाली असून बांबू पासून वस्तू तयार करण्याच्या डिप्लोमाला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कौशल्य विकास केंद्राने आपले अस्तित्व ठळकपणे सिद्ध केले आहे.आता या कौशल्य विकास व रोजगार निर्मितीच्या केंद्राला राष्ट्रीय मान्यता मिळली असून नुकताच प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या स्कॉच संस्थेच्या सुवर्णपदकाने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला सन्मानित करण्यात आले आहे.

         ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात कार्यरत या केंद्राचे संचालक श्री. राहुल पाटील  व त्यांच्या संपूर्ण चमूला नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमांमध्ये आदिवासी क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीच्या संधी मिळवून दिल्याबद्दल हा अवॉर्ड देण्यात आला आहे. वनमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या ठिकाणी या केंद्राचे उपकेंद्र उभारले जात असून जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कौशल्य विकासाचे कार्य या केंद्रामार्फत होत आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या चिचपल्ली येथे बांबूपासून सुरू असलेल्या इमारतीची दखल सिंगापूरच्या प्रसार माध्यमांनी घेतली आहे. आशिया खंडात बांबूपासून तयार करण्यात येणारी ही पहिली व एकमेव इमारत

     महाराष्ट्र वन विभागा अंतर्गत 4 डिसेंबर.2014 रोजी बांबू क्षेत्राच्या शाश्वत विकासाकरीता बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, ( बीआरटीसी ) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बीआरटीसी संशोधन, प्रशिक्षण, पायाभूत सुविधा आणि  क्षमाता बांधणी या माध्यमातून बांबू क्षेत्रासाठी प्रयत्न करीत आहे. या संस्थेच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेत रोजगार निर्मिती या श्रेणीतील यंदाचा Skoch अवॉर्ड 2018 च्या सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली  वनविभागाची दमदार वाटचाल बांबू क्षेत्रातील या कामगिरीने ठळकपणे अधोरेखित झाली आहे.